शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा बंदीच्या आदेशाला खो

By admin | Updated: January 17, 2015 01:27 IST

गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाचा निर्णय चांगला आहे.

भंडारा : गुटखा सेवन करणाऱ्यांना तोंडाचे आजार होत असल्याने आता त्यावर बंदी आणण्याचा शासनाचा निर्णय चांगला आहे. तरी या निर्णयाचे परिणामच शून्य असून आता गुटख्याचे व्यसन जडलेल्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.गुटखा बंदीनंतर बहुतांश मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात थेट गुटखा विक्री कमी केली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने गोंदिया जिल्ह्यात शेजारी राज्यातून गुटखा आयात केला जात आहे. अवैध मार्गाने आयात करणाऱ्यांसाठी हा मार्ग जोखमीचा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच तयार होणारा निकृष्ट गुटखा विकणे सुरु आहे. दीड वर्षापूर्वी गुटखा विक्रीला बंदी करण्यात आली. विक्रीनंतर बंदी लादली असली तरी उत्पादनावर कोणतेही बंधने नसल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात गुटखा पुडी सहज उपलब्ध होते. बंदीपूर्वी एक पुडी घेऊन गुटखा खाणाऱ्या युवकाच्या माथी आता एकाच वेळी पाच पुड्या मारल्या जातात. साहजीकच खिशात गुटखा पुड्या असल्याने वाटेल तेव्हा तो फाडून तोंडात टाकण्याची सवय वाढली आहे. बंदीपूर्वी गुटखा खाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी बंद नंतर ती कमी होईल, हा शासनाचा उद्देश एकूणच पूर्ण झालेला नसल्याने जिल्ह्यात दिसून येत आहे. गुटखा खाण्याची अमल आली तेव्हाच पुडी विकत घेण्याची सवय असणारे ५० टक्केपेक्षा अधिक तरुण आणि प्रौढ होते. आता मात्र हेच तरुण दिवसभर पुरेल एवढ्या गुटखा पुड्या एकाच वेळी विकत घेतात. खिशात पुड्या राहत असयाने कुठेही असो, पुडी विकत घेण्यासाठी जावे लागत नाही. अशा पुड्या घेणाऱ्यांची संख्या ६५ टक्के आहे. गुटखा खाण्याची आठवण झाल्यानंतर पानठेल्यावर जाऊन गुटखा विकत घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच बंदीनंतरही गुटखा खाणे बंद करणे किंवा तंबाखूजन्य पदार्थापासून परावृत्त झालेल्यांची संख्या नगण्य आहे, असे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)गुटखा बंदीनंतरही व्यवसाय बहरलेलाचगुटखा बंदीच्या दीड वर्षाच्या कालावधीत गुटखा विक्रीच्या व्यवहारावर नजर टाकली तर गुटखा व्यवसाय बहरलेलाच दिसतो. खाणपाणाची संख्या कमी झालेली नाही. तेव्हा गुटखा विक्री उघडपणे होत होती व खाणाऱ्यांकडून एक किंवा दोन पुड्या विकत घेवून खाण्याची सवय होती. आता गुटखा पुडी विक्री करणारे व्यवसायीक नेहमीच्या ग्राहकांना गुटखा पुडी विकत असल्याने एकाच वेळी दिवसभरात पुरेश एवढ्या गुटखा पुड्या विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.