फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरवर दोस्ती करून त्यातून सुखीसंसाराचे स्वप्न कुणी पाहत असेल तर ती व्यक्ती स्वत:ला खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असेच म्हणावे लागेल. अरेंज मॅरेजमुळे थाटलेला संसार सुखी आणि समाधानी होत असतो; परंतु प्रेमप्रकरणातून सुरू केलेला संसार किंवा ऑनलाईनमधून झालेल्या मित्रतेला सुखीसंसारात वळविण्याचा प्रयत्न केला तरी तो बहुधा अपयशी ठरत असल्याचेही दिसून येत आहे.
बॉक्स
अशी होऊ शकते फसवणूक
आपल्याशी कुणी मिळकतीवरून लग्न करण्याच्या गोष्टी करीत असेल तर सावध व्हा. ती व्यक्ती आपल्याला पाहून नाही तर आपला पैसा पाहून जवळ येत आहे. तो आपली कधीही फसवणूक करेल. यासाठी आपण सतर्क राहा. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन आपल्याशी जवळीक साधून मित्रता करतील. हळूहळू लग्नाच्या गोष्टी सुरू होतील. समोरच्या व्यक्तीच्या काय आवडीनिवडी करीत स्वार्थ साधण्यासाठी श्रीमंत तरुणांच्या नादी लागून त्यांना जाळ्यात अडकविण्याचा यशस्वी प्रयत्न करतात.
कोट
ऑनलाईन पद्धतीने जोडीदार शोधताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुणी व्यक्ती आपली फसवणूक तर करीत नाही ना, याची शहानिशा करावी. पैशापायी आपल्यासोबत कुणी व्यक्ती जुळून आपल्यासोबत विवाहबंधन बांधण्याच्या गोष्टी करीत असेल तर त्याची स्वत: काळजी घ्यावी.
- जयवंत चव्हाण, एलसीबी प्रमुख