शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळता प्रवास

By admin | Updated: February 5, 2015 23:02 IST

रेल्वे प्रशासन प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचा दावा करीत असले तरी तुमसर - तिरोडी प्रवाशी रेल्वेगाडीत शेकडो प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे.

डेमो रेल्वे हाऊसफुल्ल : गोबरवाही रेल्वेस्थानकावर थांबली दोन तास गाडी, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षमोहन भोयर - तुमसररेल्वे प्रशासन प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचा दावा करीत असले तरी तुमसर - तिरोडी प्रवाशी रेल्वेगाडीत शेकडो प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकावरून प्रवाशी रेल्वे हाऊसफुल्ल झाल्याने शेकडो प्रवाशांनी जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास केला. तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशातील तिरोडी रेल्वे स्थानकादरम्यान दिवसातून चारवेळा प्रवाशी रेल्वेगाडी धावते. सकाळी ६ वाजता व १०.३० ची डेमो प्रवासी रेल्वेत दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या गाडीला चार ते पाच डब्बे राहतात. गोंदिया - नागपूर, रायपूरकडून मोठ्या प्रमाणावर प्रवाशी येथे उतरतात. पुढे तिरोडीकडे ते जातात. मध्यप्रदेशाकडे जाणारा हा एकमेव रेल्वे मार्ग आहे. रेल्वेचे तिकीट दर कमी आणि सुरक्षित प्रवासाकरिता प्रवाशी या रेल्वेने जातात. या मार्गावर मॅग्नीज खाणी असून मजुरांची संख्या अधिक आहे. उत्तर भारतात जाण्याकरिता हा मार्ग कमी अंतराचा आहे. तिरोडी - कटंगी व बालाघाटला याच मार्गाने जाता येते. या प्रवाशी रेल्वेत प्रवेश करण्यासाठी जागा नसते. गुरुवारी महिला व वृद्ध प्रवाशांनी खासगी तथा बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. शेकडो प्रवाशांनी दारावर उभे राहून लोंबकळत जीव धोक्यात घालून प्रवास केला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तथा कर्मचारी हे केवळ पाहतात. या रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या कमी असल्याने गाडीत तिकीट तपासणीस राहत नाही. तिकीट विक्री केंद्र या मार्गावरील अनेक स्थानकावर रेल्वे प्रशासनाने बंद केली आहेत. तुमसर रोड रेल्वे स्थानक ‘ड’ दर्जाचे असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दोन महिन्यापूर्वी तुमसर रोड येथे सांगितले होते. तिकीट विक्री कमी होत असल्याने सुविधा पुरविल्यास रेल्वे प्रशासन असमर्थ आहे अशी प्रतिक्रिया विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली होती.