शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान तलावातील कमळ कोमेजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:29 IST

कमळ चिखलात उगवते. परंतु चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. तुमसर शहरातील हनुमान तलावात मोठ्या संख्येने कमळाची फुले बहरली आहेत. मात्र या तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने कमळ फुल कोमेजून जात आहे.

ठळक मुद्देजैवविविधतेला धोका : तलावाचे वैभव नामशेष होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कमळ चिखलात उगवते. परंतु चिखलाचा एकही वाईट गुण घेत नाही. कमळ हे राष्ट्रीय फुल आहे. तुमसर शहरातील हनुमान तलावात मोठ्या संख्येने कमळाची फुले बहरली आहेत. मात्र या तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने कमळ फुल कोमेजून जात आहे. कमळाचा नैसर्गिक अधिवास तलाव व पानथडीची जागा कमी होत असून जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे.कमळ चिखलात आणि पाण्यात आढळते. ही एक जल वनस्पती आहे. तुमसर शहरात देव्हाडी मार्गावर खासगी हनुमान तलाव आहे. हा तलाव प्राचीन आहे. एकेकाळी तलावाला वैभव प्राप्त झाले होते. येथील एका श्रीमंत अग्रवाल कुटुंबियांनी या तलावाला देखणे रुप दिले होते. आजही हा तलाव येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. सुमारे ७० ते ८० एकरात शहराच्या मध्यभागी हा तलाव आहे. या तलावात सध्या मोठ्या संख्येने पांढरे कमळ फुलले आहे. सकाळी सुर्योदय समयी संपूर्ण तलाव पांढºया शुभ्र कमळाने फुललेला दिसतो. या तलावाचे वैभव कमळ फुल असून तेच आता दुर्लक्षित झाले आहे.तलावाच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकला जातो. रद्दी, रद्दी पेपर, पॉलिथीन, शीतपेयाच्या बाटल्या येथे फेकल्या जातात. रात्री तलावांजवळ मद्यपींची गर्दी दिसून येते. नैसर्गिक स्थळ असल्याने येथे आंबटशौकीनांचा अड्डा असतो. त्यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. कमळ सौंदर्याचे प्रतीक असून कमळाचे फुल सुगंधी आणि मोठे असते. जीवनाचे दर्शन घडविणारे कमळ फुलाचा व पानाचा औषधीसाठी वापर केला जातो. मात्र आता हे कमळच दुर्लक्षित झाले आहे. कमळाची पाने व फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येवून वाढतात. बहुउपयोगी कमळ फुल वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.असे आहे महत्त्वदेशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारात कमळाचा उल्लेख आहे. भारतीय डाक विभागाने कमळावर तिकीट प्रकाशित केले आहे. कमळाला ज्ञानाचे प्रतीक मानतात. अध्यात्मात कमळ हे फुल देवी लक्ष्मीच्या हातात आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्हच कमळ आहे.