स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमतच्या वतीने लाखनी येथील क्रीडा संकुलात शनिवार दि. १० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उद्घाटकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र वाघाये उपस्थित होते. अतिथी म्हणून भाजपा जिल्हा सचिव भरत खंडाईत, खंडविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष धनू व्यास, पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे, राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे, जि.प. सभापती विनायक बुरडे , प्राचार्य धनंजय तिरपुडे, ॲड. शफी लध्दानी, पोलीस उपनिरीक्षक कोरचे, गटशिक्षण अधिकारी सुभाष बावनकुळे, प्राचार्य डॉ. डी. डी. कापसे, जेम सी प्रकल्पाचे चेतन चव्हाण, प्रा. डॉ. अमित गायधनी, निमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, राजू निर्वाण, आपत्ती व्यवस्थापनचे तालुका समन्वय नरेश नवखरे, प्राचार्य अशोक चेटुले आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी डॉ. शेखर जाधव यांनी कोरोना कालावधीत लोकमतने केलेल्या जनजागृतीचे महत्त्व सांगितले. बुरडे यांनी लोकमत नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असल्याचे सांगितले. अमित पांडे यांनी लोकमत रक्ताचं नातं उपक्रमाचे कौतुक केले व तरुणांनी रक्तदानात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. व्यास यांनी दर्डा परिवाराने देशाच्या सेवेसाठी नेहमी पुढाकार घेऊन राष्ट्रहित जोपासल्याचे सांगितले. डॉ. कापसे यांनी लोकमतच्या उपक्रमासाठी नेहमी सहकार्य असल्याचे सांगितले. बावनकुळे यांनी रक्तदानाची चळवळ लोकप्रिय करण्याचे कार्य लोकमत करीत असल्याचे सांगितले. संचालन लोकमत तालुका प्रतिनिधी चंदन मोटघरे यांनी केले. शिबिरात विनोद भुते व शिल्पा भुते या पती-पत्नींनी रक्तदान करून आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमासाठी विदर्भ महाविद्यालयाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. प्रा. राखी तुरस्कर, सामाजिक कार्यकर्ते मोहन निर्वाण, दिनेश पंचबुद्धे, नरेश नवखरे, प्रशांत वाघाये,डॉ. अतुल दोनोडे, प्रा. धनंजय गिऱ्हेपुंजे, प्रा. बाळकृष्ण रामटेके, समर्थ महाविद्यालयाचे एनएसएस व एनसीसी पथक, विदर्भ महाविद्यालयाचे रासेयो पथक, निमा संघटनचे डॉ. चंद्रकांत निबांर्ते , जेएमसी फ्लॉय ओव्हर प्रोजेक्ट, प्रा. डॉ. नाजुक बनकर, प्रा. डॉ. प्रशांत पगाडे, प्रा .संजय गिऱ्हेपुंजे, लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, तालुका संयोजिका शिवानी काटकर, सारिका वाघाडे, लोकमत जिल्हा शाखा व्यवस्थापक मोहन धवड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, प्राचार्या अर्चना सार्वे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सचिन करंजेकर, ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक प्रतिमा सोनवाने, सीमा बावनकर, सृष्टी नेचर क्लब व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी, लाखनी नगरपंचायतचे सहकार्य लाभले.