सखींच्या कार्यांचा सन्मान : सात क्षेत्रांचा समावेशभंडारा : लोकमत सखी मंचतर्फे सखींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्ड दि. १४ आॅक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता मंगलमुर्ती सभागृह खात रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदीपक सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तुत्वाचा गौरव व प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. यावर्षी लोकमत सखी सन्मान अवॉर्ड सात क्षेत्रात विभागून देण्यात येणार आहे. यात सामाजिक, साहित्यीक व कला, क्रीडा उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक, वैद्यकीय, शौर्य आदी क्षेत्राचा समावेश आहे. अधिक माहितीकरीता लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांच्याशी (८०८७१६२३५२), (९८५०३०४१४३), (०७१८४-२५२६३१) या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. (मंच प्रतिनिधी)‘अप्सरा आली’ लावणी कार्यक्रमनागपुर व भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिध्द कलाकार खास सखींकरिता बहारदार लावणीचा नजराना सादर करतील. अप्सरा आली, रेशमाच्या रेघांनी सोळाव वरिस धोक्यात, नादखुळा, छत्तीस नखरेवाली व खेळताना रंगाबाई होळीचा अशा मनमोहक गाण्यावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करतील. कार्यक्रमात युवती महिला व सखी मंच सदस्यांना सहपरिवार नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल.
लोकमत सखी सन्मान अवॉर्ड
By admin | Updated: October 10, 2016 00:34 IST