स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेअंतर्गत मंगळवारी मोहाडी येथील सुलोचना देवी पारधी विद्यालय तथा सुदामा कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांनी बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार व अभिवादन करून केले. अध्यक्षस्थानी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश हटवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, भाजप ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रविकांत देशमुख, भाजप युवा मोर्चा जिल्हा महासचिव शैलेश गभने, तहसीलदार देविदास बोंबर्डे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, मुख्याध्यापक अविनाश चौधरी, कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, निमाचे डॉ. प्रशांत थोटे, मोहाडीचे ठाणेदार राहुल देशपांडे, सिराज शेख, संजय मते, यशवंत थोटे उपस्थित होते. रक्त संकलनासाठी शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. मीरा सोनवणे, रक्तपेढी तंत्रज्ञ सीमा तिजारे, लोकेश गोटफोळे, राहुल गिरी, पल्लवी अतकरी, जीवन आगाशे, प्रदीप सपाटे, विनोद बोरकर, रमेश ठवकर, हेमंत लोनदासे, चुन्नीलाल आगाशे, ललित घाटबांधे, विनोद भगत यांनी परिश्रम घेतले. या शिबिराला राजेश हटवार, सदाशिव ढेंगे यांचे विशेष सहकार्य लाभले. संचालन राजू बांते यांनी, तर आभार युवराज गोमासे यांनी मानले.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
शिबिरात नरेंद्र निमकर, उमाकांत बारापात्रे, ज्ञानेश्वर हाके, गजानन नान्हे, वैभव जाधव, संजय बडवाईक, मिथुन चांदेवार, रविकांत देशमुख, शैलेश गभने, दिनेश निमकर, राजेंद्र मेहर, रतन शेंडे, दिनेश बांते, खुशाल बारई, अंकुश ढबाले, अजय कुंभारे यांनी रक्तदान केले.