भंडारा : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक विश्रामगृहात सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होईल. स्थानिक विश्रामगृहात ‘दीपोत्सव’चे लोकार्पण खासदार नाना पटोले, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांच्या हस्ते करण्यात येईल. (प्रतिनिधी)
लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
By admin | Updated: November 5, 2015 00:36 IST