शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

Lok Sabha Election 2019;  महिला मतदारांची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:59 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढल्याचे २००९ आणि २०१४ या वर्षाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास दिसून येते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यांमिळून एकूण मतदार संख्या १६.३० लाखांच्या वर गेली होती. आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे.

ठळक मुद्देचुरस वाढणार : प्रत्येक वेळी वाढतेय संख्या, प्रचारातही महिलांचा सक्रिय सहभाग

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढल्याचे २००९ आणि २०१४ या वर्षाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास दिसून येते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यांमिळून एकूण मतदार संख्या १६.३० लाखांच्या वर गेली होती. आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे. यावेळी एकूण मतदार संख्या १७ लाख ९१ हजार ६५२ असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या ८ लाख ९४ हजार २१२ इतकी आहे. जवळपास महिला मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या निम्मी आहे. परिणामी महिला मतदारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.महिलांना राजकारणात समान संधी मिळण्यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण जाहीर केले.कालपर्यंत केवळ घर सांभाळणारी स्त्री जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषदांचा कारभारात आपला ठसा उमटविताना दिसत आहे. मात्र, अनेक ठिकाणी ‘सौ’ऐवजी त्यांचे ‘श्री’च कारभार हाकतानाही दिसून येतात.महिला आरक्षणाचे चित्र केवळ कागदावर न राहता, नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे.खऱ्या अर्थाने महिला आरक्षणामागील हेतू सफल होणार असल्याने अनेक ठिकाणी आता महिलांनी सक्रिय होण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता मतदानातील जवळपास अर्धा वाटाही महिलांचा झाला आहे. निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी जनजागृती अभियान राबविले. विशेष नोंदणी मोहिमेतही महिला मतदारांची संख्या वाढली. महिला आपल्या हक्कांसाठी जागृत होत असल्याचे मतदार नोंदणीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.तीन विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांची संख्या अधिकसाधारणत: पुरूष मतदार मतदारांची संख्या मतदार यादीत अधिक दिसून येते. परंतु भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतदार संख्येवर नेजर टाकल्यास भंडारा, तिरोडा आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. गोंदिया विधानसभा क्षेत्रात पाच हजार ७५१, तिरोडा विधानसभा क्षेत्रात २००७ आणि भंडारा विधानसभा क्षेत्रात १४४ महिला मतदार पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.