शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; लाखनी तालुक्यात १०१६ दिव्यांग मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:02 IST

भारतीय निवडणूक अयोगद्वारा लोकसभेच्या निवडणुका भंडारा-गोंदिया क्षेत्रात ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. निवडणूक आयोगद्वारे सुलभ निवडणुका अंतर्गत अपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांचा केंद्रानुसार आढावा घेऊन अपंग मतदारांना कोणाच्याही मदतीशिवाय मतदान करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देगावागावांत जनजागृती सुरू : १३४ मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी सुविधा

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भारतीय निवडणूक अयोगद्वारा लोकसभेच्या निवडणुका भंडारा-गोंदिया क्षेत्रात ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. निवडणूक आयोगद्वारे सुलभ निवडणुका अंतर्गत अपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांचा केंद्रानुसार आढावा घेऊन अपंग मतदारांना कोणाच्याही मदतीशिवाय मतदान करणे शक्य होणार आहे.साकोली विधानसभा मतदार संघातील लाखनी तालुक्यात १३४ मतदान केंद्रापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येत आहे. तालुक्यात १०१६ दिव्यांग मतदार आहेत. त्यापैकी अंध १२३, अपंग ७५६, कर्णबधीर ७८, मुकबधीर ३१ व इतर प्रकारचे ५७ दिव्यांग मतदार आहेत. तालुक्यातील ९८ मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्हिलचेअरची गरज आहे. त्यासाठी ६८ व्हिलचेअरची गरज आहे.तालुक्यातील लाखोरी, सामेवाडा, सावरी, आलेसूर, मासलमेटा, राजेगाव, केसलवाडा पवार, परसोडी, लाखनी, केसलवाडा वाघ, मानेगाव सडक, पिंपळगाव सडक, सिपेवाडा, रेंगेपार, कोहळी, पोहरा, धाबेटेकडी, शिवणी, पेंढरी, मिरेगाव, सोमनाळा, दिघोरी, इसापूर, मुरमाडी तुपकर, डोंगरगाव, मेंढा, टोली, गुरढा, निमगा, भुगाव, जेवनाळा, कवडसी, कोलारी, किटाडी, कवलेवाडा, विहीरगाव, देवरी गोंदी या ठिकणच्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची संख्या जास्त आहे.दिव्यांग मतदारांना हॅन्डरेल असलेले रॅम्प उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंध मतदारांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर अपंग मतदारासाठी व्हिल चेअरची सोय करून दिली जाणार आहे. तहसिल प्रशासनाद्वारे ग्रामपंचायतला व्हिलचेअर खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. त्यानुसार ६८ व्हिलचेअरची खरेदी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारावर भर दिलेला आहे. लोकशाहीत प्रत्येकांना मतदान करण्याचा हक्क आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता दिव्यांगांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशिल आहे. प्रत्येक गावातून दिव्यांगाची माहिती गोळा करणे सुरू आहे.सुलभ निवडणुकाद्वारे दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक गावात जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतला व्हिलचेअर खरेदी करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.-मल्लिक विराणी, तहसीलदार लाखनी.