शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेला कुलूप ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:45 IST

बापूची अनुदानित आश्रमशाळा, आंबागड येथील मुलाच्या मृत्युप्रकरणी अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता आदिवासी विद्यार्थी संघाने आंबागड येथे गुरूवारी आश्रमशाळेला कुलूप ठोको आंदोलन केले.

ठळक मुद्देआंबागड येथील प्रकार : आंदोलनकर्त्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बापूची अनुदानित आश्रमशाळा, आंबागड येथील मुलाच्या मृत्युप्रकरणी अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नाही. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता आदिवासी विद्यार्थी संघाने आंबागड येथे गुरूवारी आश्रमशाळेला कुलूप ठोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शेकडो आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.३० जुलै रोजी बापूजी आदिवासी आश्रमशाळेतील महेंद्र सलामे या विद्यार्थ्यांचा वीज तारांना स्पर्श होऊन घटनास्थळी मृत्यु झाला होता. याकरिता आदिवासी संघटनेने आंदोलन केले होते. शाळेचे संचालक सचिन राजू सेलोकर, अध्यक्ष हेमराज कापगते, उपाध्यक्ष अनंतलाल दमाहे व अधिखक अनिल बोरकर यांच्यावर भांदवी ३०४ (अ) ३४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधितांना अटक करण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे.आदिवासी प्रकल्प अधिकाºयांचे येथे नियंत्रण आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणीही संघटनेने केली आहे. स्व. इंदिराबाई मरस्कोल्हे अनुदानित पवनारखानी आश्रमशाळेत आतापावेतो सात विद्यार्थ्यांचा मृत्यू विविध कारणाने झाला.या दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य मायाताई ईनवाते आल्या होत्या. त्यांनी दोन्ही आश्रमशाळांची पाहणी व चौकशी केली. कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले होते. गुरूवारी आंबागड येथे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, जि.प. सदस्य उत्तम कळपते, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, राजू वाडवे, दुर्गाप्रसाद परतेती, लिखराम मरस्कोल्हे यांना पोलिसांनी अटक केली.