शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: January 14, 2017 00:29 IST

स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेत नाव नोंदविण्याच्या कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या ...

पिंडकेपार येथील घटना : गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारभंडारा : स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेत नाव नोंदविण्याच्या कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या वादाच्या पर्यावसातून शाळेला कुलूप ठोकण्यात आले. ही घटना भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संतप्त झालेल्या शाळा समितीच्या अध्यक्षासह काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापक श्रावण हजारे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ या वर्गात एकुण ३२ विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत जिर्ण झाली असल्याने विद्यार्थी झाडाखाली किंवा बांधण्यात आलेल्या एका खोलीत विद्यार्जन करतात. मुख्याध्यापक श्रावण हजारे हे शाळेत येतात, मात्र विद्यार्थ्यांना शिकवित नाहीत असा आरोपही त्यांच्यावर यावेळी लावण्यात आला. दरम्यान २२ जानेवारीला शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त निमंत्रण पत्रिका छपाईचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिकेत कुणाची नावे घालायची या विषयावर चर्चा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव कावळे व मुख्याध्यापक श्रावण हजारे यांच्यामध्ये वाद झाला. वादात मुख्याध्यापक हजारे यांनी कावळे यांना माझी बदली करुन दाखवा, असे झाल्यास सप्रेम भेट म्हणून मी तुम्हाला ५० हजार रुपये देईन असे बोलले. याच कारणावरुन आज सकाळी संतप्त झालेल्या कावळे यांच्यासह अन्य गावकरी शाळेत आले. तसेच अध्यक्षांसोबत असभ्य बोलणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करुन त्यांची बदली करावी या कारणासाठी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य वर्षा साकुरे, सरपंच प्रशांत रामटेके, पोलीस पाटील साठवणे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बबलु आतिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकांना पाठिंबाक्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापकांना नाहकच गोवले जात आहे. त्यांची मागील चार वर्षांची कामगिरी चांगली आहे. त्यांनी या शाळेत विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी कामे केली आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप योग्य नाही. चर्चा करुन विषय सोडविण्यात यावा, अशी प्रतिक्रिया येथील उपस्थित काही महिलांनी व्यक्त केली. मात्र या वादात शाळा बंद करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये याची काळजी घेतली जावी असेही मत व्यक्त केले. यावरुन या महिलांचा मुख्याध्यापकांना पाठींबा असल्याचे जाणवले.मागील चार वर्षांपासून शाळेत विविध उपक्रमांसह शालेय वास्तु बांधकामासाठी पाठपुरावा करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे असा हेतु माझा कधीही राहिलेला नाही. स्वखर्चाने मी काही कामे केली आहेत. याची कबुली स्वत: पालकांसह विद्यार्थीही देतात. माझ्या बोलण्याने कुणाचे मन दुखावले असेल तर मी जाहिरपणे माफी मागतो. - श्रावण हजारे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा, पिंडकेपारशाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसोबत असभ्य भाषा वापरणे अत्यंत चुकीची बाब आहे. असे वर्तण कदापी खपवून घेण्यात येणार नाही. मुख्याध्यापकांची बदली करण्यात यावी, हीच मुख्य मागणी आहे.- बबलू आतिलकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पिंडकेपार