शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा फटका, प्रवासी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

तुमसर आगाराला सव्वा दोन कोटींचे नुकसान तुमसर: मागील ३८ दिवसांपासून एसटीची चाके थांबली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध ...

तुमसर आगाराला सव्वा दोन कोटींचे नुकसान

तुमसर: मागील ३८ दिवसांपासून एसटीची चाके थांबली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले. प्रवासी वाहतूक बंद असल्याने तुमसर आगाराला आतापर्यंत सुमारे सव्वा दोन कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगारातून दररोज भंडारा, नागपूर व गोंदिया येथे बसगाड्या सोडण्यात येतात. त्यांनाही प्रवासी मिळत नाही.

भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार हे क्रमांक दोनचे उत्पन्न मिळवून देणारे आगार आहे हे विशेष.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले. त्यामुळे मागील अडतीस दिवसांपासून तुमसर आगारातील सुमारे ७० बसगाड्या आगारात थांबल्या आहेत.

येथे दर दिवशी सहा लाख रुपयांचे उत्पन्न येत होते. त्यामुळे ३८ दिवसात सुमारे सव्वा दोन कोटींचे आर्थिक नुकसान आगाराला झाले आहे.

सध्या आगारातून शासनाच्या निर्देशानुसार भंडारा, नागपूर व गोंदिया येथे दररोज बस सोडण्यात येतात. बस मध्ये किमान प्रवासी संख्या २२ असणे गरजेचे आहे. या आगारातून बस सुटताना किमान १५ प्रवासी असले पाहिजेत. रविवारी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. आगारात प्रवासी न आल्याने हा निर्णय घेण्यात आला. दररोज सकाळी ८ व सायंकाळी ४ वाजता येथून बस गाडी सोडण्यात येते.

ग्रामीण भागात बसगाड्या बंद: मागील ३८ दिवसांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच जिल्ह्यातील इतर भागात बसगाड्या सोडण्यात येत नाहीत. या लोकवाहिनीतून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करीत होते.

कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार आहे. हे आगार एसटी महामंडळाला क्रमांक दोनचे महसूल उत्पन्न मिळवून देणारे आगार आहे. अनलॉक झाल्याशिवाय पूर्वीप्रमाणे येथे वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी आहे. सध्या बसस्थानकावर शुकशुकाट दिसून येतो.

लॉकडाऊननंतर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे दररोज किमान सहा लाख रुपयांचे उत्पन्न या आगाराला मिळत होते. सध्या भंडारा, नागपूर व गोंदिया येथे किमान २२ प्रवासी घेऊन बस गाडी सोडण्यात येते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

युधिष्ठिर राम चौरे, आगार प्रमुख तुमसर.