शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकल ब्रँडची विक्री ब्रँडेडच्या किमतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:36 IST

बाजारात नावारुपास आलेल्या ब्रँडची नक्कल करून त्याच किमतीत लोकल ब्रँड विकण्याचा गोरखधंदा गत काही वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार सर्वाधिक मिनरल वॉटरमध्ये दिसत असून एमआरपी दडवून ब्रँडेड कंपन्यांच्या दरात विक्री केली जाते.

ठळक मुद्दे‘एमआरपी’चे गौडबंगाल : सर्वाधिक लूट मिनरल वॉटरमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाजारात नावारुपास आलेल्या ब्रँडची नक्कल करून त्याच किमतीत लोकल ब्रँड विकण्याचा गोरखधंदा गत काही वर्षांपासून सुरू आहे. हा प्रकार सर्वाधिक मिनरल वॉटरमध्ये दिसत असून एमआरपी दडवून ब्रँडेड कंपन्यांच्या दरात विक्री केली जाते. गुणवत्ता आणि सर्व निकष डावलून स्थानिक कंपन्या ब्रँडेडच्या नावावर चांगभल करून घेत आहे. मिनरल वॉटरसह विविध कोलड्रिंक्स विकताना कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून अधिक पैसे वसूल केले जातात. भंडारा शहरात हा प्रकार राजरोस सुरू असून याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण वळणाच्या भंडारा शहरात मल्टीप्लेक्स संस्कृती अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे एमआरपीपेक्षा अधिक किमतीत खाद्यपदार्थांची विक्री सहसा होत नाही. पॅकिंगवर असलेली किमतच ग्राहकांकडून घेतली जाते. मात्र मिनरल वॉटर आणि कोलड्रिंक्समध्ये ग्राहकांची लुट सुरू आहे. शहरात मिनरल वॉटरच्या बँ्रडेड कंपन्यासह लोकल कंपन्याची सरमिसळ करून विक्री केली जाते. मिनरल वॉटरच्या पाच-सहा कंपन्यांचे बाटलीबंद पाणी शहरात विकले जाते. ग्रामीणच नव्हे तर शहरी ग्राहकांच्याही लेखी मिनरल वॉटर म्हणजे ‘बिसलेरी’ असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे बाटलीबंद पाणी बिसलेरीचे पाणी म्हणूनच विकले जाते. याचाच फायदा हुशार दुकानदार घेत आहेत. अधिक नफा कमाविण्याच्या नादात स्थानिक कंपन्यांचे पाणी ग्राहकांच्या माथी मारले जाते. एकाद्या चोखंदळ ग्राहकाने विशिष्ट कंपनीचा आग्रह धरला तर दुकानदार त्याला थेट नाही असे म्हणतात. यामागचे गौडबंगाल म्हणजे बॅ्रंडेड कंपन्याच्या मिनरल वॉटरवर प्रॉफिट आॅफ मार्जिन अतिशय कमी असते. उलट स्थानिक कंपन्या आपले उत्पादन कमी किमतीत दुकानदारांना देतात. मात्र दुकानदार ग्राहकाला तिच बॉटल ब्रँडेडच्या किमतीत विकतात. यातून अधिक नफा कमाविला जातो. मात्र स्थानिक कंपन्यांची गुणवत्ता अतिशय सुमार असते. आरोग्याची कोणतीही काळजी घेतली गेली नसते. मात्र ग्राहक जागृत नसल्याने तक्रार केली जात नाही. त्यातही बाटलीबंद पाणी विकत घेणारे ग्राहक साधारणत: बाहेर गावचे असतात. तहान भागवायची आहेना असे म्हणत दुकानदाराने माथी मारलेले पाणी प्राशन करतात आणि निमुटपणे निघून जातात.भंडारा शहरात सॉफ्टड्रिंक्स मात्र एमआरपीपेक्षा अधिक किमतीत विकले जात असल्याचे दिसून आले. आंब्यापासून बनविलेल्या आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले सॉफ्टड्रिंक्स पंधरा रुपयांची बॉटल २० रुपयापर्यंत विकली जाते. बालहट्टापुढे पालकांचे काही चालत नसल्याने दुकानदार म्हणेल तिच किमत द्यावी लागते. एकाद्या चोखंदळ ग्राहकाने याबाबत विचारले तर त्याला कुलिंग चार्जेस असे गोंडस नाव दिले जाते.हॉटेल आणि धाब्यांमध्ये अधिक प्रमाणभंडारा शहरासह जिल्ह्यातील हॉटेल आणि ढाब्यांवर अनेक खाद्यपदार्थ एमआरपीपेक्षा अधिक किमतीत विकले जात असल्याचे दिसून आले. मात्र बाहेरचे ग्राहक असल्याने कुणीही कुरकुर करताना दिसले नाही. बिलात लावलेली किंमत मोजून ग्राहक आपल्या मार्गाने रवाना होत होते. नेहमीच्या ग्राहकांना मात्र या ठिकाणी योग्य किंमत लावली जात होती. हॉटेलचालकांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे एकदाचेच ग्राहक असतात, त्यामुळे त्यांच्याकडून अधिक पैसे घेतल्याने तो पुन्हा यावा अशी अपेक्षाही नसते. याच मानसिकतेमुळे हॉटेल धाब्यावर एमआरपी पेक्षा अधिक किमतीत खाद्यपदार्थ व मिनरल वॉटर विकले जाते.