अभयारण्यात सोडले : कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीसाकोली : तालुक्यातील चारगाव येथे तलाव परिसरात एका चितळावर बेवारस कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात हे चितळ गंभीररीत्या जखमी झाले. चारगाव वासीयांना हे दृश्य दिसताच त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन जखमी चितळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून वनाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून चितळाला जीवदान दिले.चारगावसभोवताल जंगल वेढलेले आहे. या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. वन्यप्राणी चारगाव येथील तलावात पाणी पिण्यासाठी येत असतात. शुक्रवारी सकाळी चितळ पाणी पिण्यासाठी आले असता चार ते पाच कुत्र्यांनी चितळावर हल्ला केला. यात चितळ गंभीररित्या जखमी झाला. हा प्रकार शेतकऱ्यांना दिसला. पोलीस पाटील गोपीनाथ लंजे, महादेव लंजे, सुरेश लंजे, प्रकाश लंजे व ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेवून या चितळाला वाचविण्यासाठी धावून गेले व चितळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून चितळ सुखरूप गावात आणला. घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाला माहिती मिळताच उमरीचे सहायक वनक्षेत्राधिकारी तरोणे आपल्या ताफ्यासह चारगाव येथे पोहचले व त्यांनी हे चितळ वनकार्यालय साकोली येथे आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोळसकर यांचेकडून औषधोपचार केला नंतर हे चितळ नागझीरा अभयारण्यात सोडून दिले. यापुर्वी बेवारस कुत्र्यांनी गावातील १५ ते २० शेळ्या व कोंबड्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी चारगाववासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
चारगाववासीयांनी दिले चितळाला जीवदान
By admin | Updated: June 27, 2015 00:54 IST