शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामावर अत्यल्प मजूरी

By admin | Updated: May 15, 2017 00:28 IST

सोमनाळा (बु) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजूरांची...

मजुरांचे आंदोलन : दोन दिवस काम बंद, सोमनाळा येथील प्रकारकोंढा-कोसरा : सोमनाळा (बु) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजूरांची मजूरी ६ दिवसासाठी ४७२ ते ५०० रुपये चुकारा निघाल्याने मजूरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दोन दिवस स्त्री, पुरुष मजुरांनी काम बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सन्मानजनक मजूरी न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्त्री-पुरुष मजुरांनी दिला आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मजूरांवर काम नाही. त्यामुळे शासनाने सरकारी तलाव, नाला, पांदण रस्ते यांचे कामे काढून मजुरांच्या हाताला काम दिले आहे. सोमनाळा (बु) येथे मामा तलावाचे काम २४ एप्रिल २०१७ पासुन सुरु आहे. यासाठी शासनाने १२ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. रोजगार सेवक म्हणून बिरसराम वंजारी काम पाहत आहेत. दररोज या कामावर गावातील ३२० ते ३३० स्त्री-पुरुष मजुर काम करीत आहे. रोजगार मजूरांच्या हजेरीवर सध्या घेतल्या तेव्हा कही विशिष्ट गँगचा चुकारा ४७२ ते ५०० रुपये निघाल्याचे लक्षात आले. त्यामुळे मजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा निषेध म्हणूनदोन दिवस काम बंद ठेवून केला. मजूरांचे म्हणणे आहे की, सर्वांनी सारखे काम केले पण तांत्रिक पॅनलच्या अधिकाऱ्यांनी कामाची मोजणी करतांना भेदभाव करीत ४७२ ते ५०० रुपये सहा दिवसासाठी चुकारा काढला तर इतर चुकारा ९२८ पेक्षा जास्त रुपये काढले आहे. मजूरांना काम करतांना माती खोदकाम करुन जवळपास १५० मीटर तलावाच्या पाळीवर माती वाहून न्यावे लागत आहे. मजूरांनी रोजगार सेवकांनी अनेक बोगास मजूर कामावर दाखविले असल्याचा आरोप केला आहे. मजूरांनी कोऱ्या मस्टरवर सही घेतली जात असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे मजूरात असंतोष निर्माण झाला आहे. सदर प्रकरण आमदार अ‍ॅड. अवसरे यांनाही कळविण्यात आले.सरकारी मजूरी २०१ रुपये प्रतिदिवस आहे. त्यासाठी २०३५ घनमीटर काम होणे आवश्यक आहे. माती खोदकामानुसार मजूरांची मजुरी काढली आहे. यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही.- सतिश माकडे, तांत्रिक पॅनल पं.स. पवनीसर्व मजूरांना समाधानकारक मजूरी मिळाली पाहिजे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.- रेखा भोवते, सरपंच सोमनाळा (बु.)