महेंद्र रमेश खांडेकर (३७) आणि उमेश गणविर (२५) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी दारू विक्रेता केदार वाल्मीक वलके (४२) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र आणि उमेश हे माेखे येथे केदार वलके याच्याघरी दारू विकत घेण्यासाठी गेले हाेते. तेथे त्यांनी देशी दारूचा पव्वा विकत घेऊन ५०० रुपयांची नाेट दिली. ४२० रुपये परत मागितले. परंतु केदारने पैसे परत केले नाही. त्यावरून वाद झाला. धक्काबुक्की करण्यात आली. एवढेच नाही तर घरात जाऊन लाेखंडी वस्तू आणून मारली. महेंद्रच्या डाेक्यातून रक्त येत असल्याने त्याला साेडविण्यासाठी उमेश गेला त्याच्यावरही काठीने हल्ला करण्यात आला. जखमीला साकाेलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आराेपीविरुध्द साकाेली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू विक्रेत्याने केली दाेघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST