लाखनी : लोकमत सखी मंच शाखा लाखनीतर्फे येथील आर्शिवाद भवनात ब्युटी व हेअर स्टाईल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात तालुक्यातील सखींनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभाग नोंदविला.ब्युटीशियन वृंदा पाखमोडे यांनी सखींना विविध प्रकारचा मेकअप व हेअर स्टाईल शिकविल्या. उन्हाळा-पावसाळा व हिवाळा या ऋतुमानात त्वचेची काळजी व वयानुसार होणाऱ्या बदलामुळे त्वचा केस यांची निगा कशी राखावीत याबद्दल मार्गदर्शन केले. घरातील कडधान्य, दुध, दही, फळ यांचा वापर करून स्क्रब व फेस पॅक तयार करणे. त्याचप्रमाणे आवळा, निंबू व संत्र्यांच्या साल यापासून पावडर तयार करून केसातील कोड्याकरीता वापरणे तसेच सौंदर्यविषयक टिप्स देण्यात आल्या. हेअर स्टाईलमध्ये लतुन वेनी, फ्रंट बॅक सागर वेणी, झुला वेणी, फ्रेंचबज ब्रायडल बन, विविध प्रकारचे आंबाडे शिकविण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिवानी काटकर यांनी केले. यावेळी पुष्पा भुरे, प्राची निखाडे, जयश्री निखाडे, चंदा नंदेश्वर, कविता मोळाकेरे, उज्वला वाघमारे, वैशाली ढेंगे, आशा रंगारी, अर्चना सार्वे, मिना माकडे, मिना मेश्राम, वैशाली निर्वाण, रूपाली माकडे, जोत्सना निर्वाण, सुनिता पेंदाम, हर्षलता नंदेश्वर, स्वर्णलता नंदेश्वर, कविता गायधनी, अर्चना हटनागर, अर्चना ढेंगे आदी सखींची उपस्थिती होती. (मंच प्रतिनिधी)
लाखनीत सौंदर्य, केशरचना कार्यशाळा
By admin | Updated: June 28, 2014 01:02 IST