शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य लॉक, पेट्रोलची दरवाढ अनलॉक; तीस वर्षांत लीटरमागे ८३ रुपयांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:34 IST

भंडारा : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत गेल्या तीस वर्षांत लीटरमागे ८३ रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम दररोजच्या ...

भंडारा : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत गेल्या तीस वर्षांत लीटरमागे ८३ रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम दररोजच्या महागाईवर होत असून, सर्वसामान्यांना जीवन जगताना कसरत करावी लागत आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर दरवाढ होत तब्बल ९८.५० रुपयांची पेट्रोलमध्ये दरवाढ झाली आहे. फक्त पेट्रोलच्या किमतीतच वाढ झालेली नाही, तर डिझेलही महाग होत असल्याने वाहतूक व्यवस्थाही महागली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याचे दर, फळांचे दर, गॅस दरवाढ, किराणा व्यवसाय या सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे.

पूर्वी सरकार एक ते दीड महिन्याच्या फरकाने दरवाढ करीत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्याने तेल कंपन्यांनी प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे सरकारकडून प्रति लीटर पेट्रोलमागे दोन ते पाच रुपये दरवाढ केली जात आहे. दरवाढीचा निर्णय होताच सामान्य नागरिक तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते सरकारविरोधात आंदोलन करायचे. मात्र अलीकडील काही दिवसांत ही आंदोलनेही होताना दिसत नाहीत. सातत्याने होणारी भाववाढ लक्षात घेता सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये दरवाढ होत आहे. असे असताना ग्राहकांच्या लक्षात येत नाही की, १९९१ मध्ये पेट्रोल १५.६२ रुपये लीटर होते. २००१ मध्ये पेट्रोलचे दर २९.७० रुपये लीटर, २०११ मध्ये ५९.६० रुपये लीटर तर २०२० मध्ये पेट्रोल ८१.२९ आणि डिझेल ७०.७१ रुपये लीटर होते. आता मे २०२१ मध्ये पेट्रोलचे दर ९८.९५ रुपयांवर पोहोचले आहेत. इतकी प्रचंड भाववाढ या तीस वर्षांत झाली आहे.

कोट

यापूर्वी सरकार एक ते दीड महिन्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करीत असे. ती दरवाढ ग्राहकांना समजत होती. त्यावर तत्काळ सर्वसामान्यांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दरवाढ मागे घेण्यासाठी आंदोलन करीत होते. मात्र अलीकडे पेट्रोल, डिझेलच्या झालेल्या प्रचंड दरवाढीचा परिणाम महागाईवर होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना सायकलवरच फिरावे लागेल.

- संजय आकरे, शिवसेना विभागप्रमुख, ठाणा

कोट

डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक व्यवसायासह बोरवेल, शेतीव्यवसायासाठी मशागतीचे दरही प्रचंड वाढले आहेत. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत त्यामुळे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत शेतीमालाला भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.

- विष्णुदास हटवार, भाजप तालुका ग्रामीण महामंत्री, भंडारा

कोट

एवढी दरवाढ होत असतानाही ग्राहक मात्र संयमीच असल्याचे दिसत आहे. कोणीही सरकारविरोधात निदर्शने, आंदोलने करताना दिसून येत नाहीत. मात्र या दरवाढीचा फायदा सरकारला होत असून, सरकारने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेता सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. लोकांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. सायकलवर फिरले तरी पेट्रोलच्या दरवाढीचा परिणाम महागाईवर झाल्याने त्याची झळ बसतेच आहे.

- दिनेश वासनिक, सामाजिक कार्यकर्ता, केसलवाडा.