शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पानठेला चालकाला जाळणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:43 IST

आईबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने पवनी येथील पानठेला चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देत ठार मारल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी ठोठावली.

ठळक मुद्देपवनीची घटना : अंगावर ओतले होते पेट्रोल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आईबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने पवनी येथील पानठेला चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देत ठार मारल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी ठोठावली.लोकेश आनंदराव बारसागडे (३६) रा. आंबेडकर चौक पवनी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर विकास पांडूरंग भोगे (४७) रा. साकोली वॉर्ड पवनी असे मृत पानठेला चालकाचे नाव आहे. पवनी येथे १५ आॅक्टोंबर २०१२ रोजी आरोपी लोकेशच्या आईबाबत विकासने अपशब्द वापरले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात लोकेशने आपल्या स्कुटीच्या डिक्कीत लपवून आणलेले पेट्रोल विकासच्या अंगावर ओतले व पेटवून दिले. विकास गंभीर जळालेल्या अवस्थेत विकासला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पवनी पोलीस ठाण्यात सुरूवातीला भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आर.एस. डेरे यांच्याकडे देण्यात आला. मात्र २३ आॅक्टोंबर रोजी विकासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी लोकेशविरूद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पवनी येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी साक्ष पुरावा गोळा करून आरोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.सदर गुन्ह्याची सुनावनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांच्या न्यायालयात करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. प्रमोद भुजाडे यांनी योग्य बाजू मांडत १२ साक्षदार तपासले. शनिवारी न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप व गंभीरता लक्षात घेवून आरोपी लोकेश बारसागडे याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड ठोठावला. याप्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार पोलीस निरीक्षक आर.एस. डेरे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून चंद्रशेखर पटले यांनी काम पाहिले.