शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी निधी खेचून आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:58 IST

शासनाने गावागावातील विकासाकरिता निधीची तरतूद केली आहे. हा निधी विविध योजनेअंतर्गत देण्यात येतो. मात्र हा निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याची क्षमता व जनसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच मिळते.

ठळक मुद्देरमेश डोंगरे : कुंभली जि.प. क्षेत्रअंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शासनाने गावागावातील विकासाकरिता निधीची तरतूद केली आहे. हा निधी विविध योजनेअंतर्गत देण्यात येतो. मात्र हा निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याची क्षमता व जनसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच मिळते. यासाठी प्रयत्न करावे लागतात. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते नेहमीच तत्पर राहतात. त्यामुळे त्यांच्या जि.प. क्षेत्रात निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.कुंभली जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोदरा येथे मनोरंजन कार्यालयात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जि.प. सदस्य होमराज कापगते, गटविकास अधिकारी सुनिल तडस, महिला काँग्रेस कमेटीच्या तालुकाध्यक्षा छाया पटले, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष जासवंत कापगते, विस्तार अधिकारी टेंभरे, पं.स. माजी सदस्य हरिभाऊ हरडे, सरपंच सरिता राऊत, सरपंच हरिश लांडगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भोजराम फुलबांधे, पोलीस पाटील दिपक कापगते उपस्थित होते.यावेळी जि.प. सदस्य होमराज कापगते म्हणाले, गावागावात विकास कामे करतांना अनेक अडचणी येतात. मात्र अडचणीवर मात करुन कामे करावी लागतात. समाजसेवा करतांना राजकारण आड आणू नये. राजकारण आणल्यास विकास कामात अडचण निर्माण होते. ही विकासकामे करतांना जनतेचे सहकार्य अपेक्षीत आहे.उपस्थित पाहुण्यांचे हस्ते बोदरा जांभळी निलागोंदी रस्ता, जांभळी मकरधोकडा बोदरा रस्ता, गुडरीटोली, गुडरी रस्ता, जि.प. शाळा बोदरा आवारभिंत, गिरोला बोडे रपटा दुरुस्ती, गिरोला दलित वस्ती सुधारणा अंतर्गत सिमेंट रस्ता, बोदरा दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत सिमेंट रस्ता, मुंडीपार दलितवस्ती सुधारणा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेविका जी. ए. गेडाम यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.