शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:31 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन, आजारपणातील रजा आदीच्या कायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधान सभेत चर्चा करावी व न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केली.

ठळक मुद्देदिलीप उटाणे : भंडारा येथे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन, आजारपणातील रजा आदीच्या कायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधान सभेत चर्चा करावी व न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केली.शारदा लॉन्स भंडारा येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हा भंडाराचे पाचवे त्रैवार्षिक भंडारा जिल्हा अधिवेशन सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आयटकचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते, जिल्हा सचिव हिवराज उके, जिल्हा परिषद सदस्य पंचबुद्धे उपस्थित होते.यावेळी उद्घाटक कुरसुंगे म्हणाल्या, मोबाईलचा उपयोग करणे आवश्यक आहे आणि ज्यांचा मोबाईल अपघाताने व इतर कारणाने खराब झाल्यास त्यांचे पैसे कपात होणार नाही. आपल्या स्थानिक मागण्या त्वरीत सोडवल्या जातील. आमदार अ‍ॅड. अवसरेंनी कर्मचाºयांना नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करेन, अशी ग्वाही दिली.सरकारने वेतन श्रेणी लागू केली, पण २०१९ ला जाहीर केलेली मानधन वाढ अजूनपर्यंत मिळाली नाही. फक्त आश्वासन दिले जातात. तसेच ९ मार्च २०१७ च्या मानधनवाढ कमिटीची शिफारस अजून मान्य झाली नाही.जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ हे अंगणवाडी कर्मचाºयांसाठी कसे घातक आहे हे सांगितले. भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांचे या तीन वर्षात दुखद निधन झाले. त्या सर्वांना यावेळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.पुढील तीन वर्षासाठी १८ लोकांची कार्यकारिणी व ७५ लोकांची अंगणवाडी कर्मचाºयांची जिल्हा कौंसिलची सर्व सम्मतीने निवड करण्यात आली. अधिवेशनाला सुमारे हजारो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने मंगला गजभिये, रिता लोखंडे, अल्का बोरकर, गौतमी मंडपे, मंगला रंगारी, सुनंदा चौधरी, शमीम बानो खान, सुनंदा बडवाईक, छाया क्षीरसागर, अनिता घोडीचोर, विजया काळे, कुंदा भदाडे, मनिषा गणवीर, जयनंदना कांबळे, सुनंदा हेडावू, संगिता मारबते, मंगला गभने, छाया गजभिये आदी कर्मचारी उपस्थित होते.