शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

केरकचऱ्यापासून होणार खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:52 IST

वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असतात. यात घनकचऱ्याची सर्वात मोठी समस्या स्थानिक प्रशासनापुढे आवासून उभी आहे. लोकसहभागाने या समस्येवर मात करायला भंडारा पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून शहरातील ओला व सुका कचऱ्याचे संकलन करून त्यातून आता खतनिर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेकडे वाटचाल : शहरात दररोज ३० टन कचऱ्याचे संकलन

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असतात. यात घनकचऱ्याची सर्वात मोठी समस्या स्थानिक प्रशासनापुढे आवासून उभी आहे. लोकसहभागाने या समस्येवर मात करायला भंडारा पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून शहरातील ओला व सुका कचऱ्याचे संकलन करून त्यातून आता खतनिर्मिती केली जाणार आहे.भंडारा शहरात दररोज ३० टन कचऱ्याचे संकलन करण्यात येत असते. यात ओला कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून त्यात काही महिन्यांपासून घरोघरी जावून कचरा संकलन करण्याचे कार्य सुरू आहे. मागील वर्षी राज्य शासनाच्या स्वच्छताउपक्रमांतर्गत अनेक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. घंटागाडीचा उपक्रम राबविल्यानंतर भंडारा पालिका प्रशासनाने आता मिनी मालवाहूच्या सहायाने कचरा संकलन करण्याचे कार्य हाती घेतले आहे. महिनाभरापासून दहा मिनी मालवाहू वाहनांच्या सहाय्याने घरोघरी जावून कचरा संकलन केले जाते. शहरात आठ प्रभाग असून ३३ वॉर्ड आहेत. लोकसंख्येच्या मानाने मिनी मालवाहू कचरा संकलन वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी होती. याअंतर्गत अजून सहा मिनी मालवाहू वाहनांचे आॅर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय शहरात दररोज दहा ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन केला जातो.जमनी येथे डम्पिंग यॉर्डशहरालगत असलेल्या जमनी येथे शहरातील संकलित केलेला सर्व कचरा संकलित करण्यात येतो. यापूर्वी हा कचरा शहराच्या पूर्व-दक्षिण सोमेवर असलेल्या बैलबाजारा नजिकच्या बायपास मार्गाच्या कडेला फेकण्यात येत होता. दीड दशकांपूर्वी जमनी येथे लक्षावधींचा खर्च करून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला होता. पंरतू याकडे दुर्लक्ष झाल्याने येथे असलेल्या मशिन्स भंगारावस्थेत तर वास्तू शोभेच्या वास्तू ठरल्या होत्या. यावर पालिका प्रशासनाने उपाययोजना आखली. आता ५ कोटी २० लक्ष रूपये खर्च करून खतनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार असून यासंदर्भात लवकरच कामालाही प्रारंभ होणार आहे.