शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मुलींंना इच्छुक क्षेत्रात काम करण्याची मुभा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 21:45 IST

मुलींना स्वतंत्र द्या, त्यांना ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छा असेल त्या क्षेत्रात त्यांना काम करू द्यावे.प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारे संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देमंजुषा ठवकर : लाखनी येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : मुलींना स्वतंत्र द्या, त्यांना ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छा असेल त्या क्षेत्रात त्यांना काम करू द्यावे.प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारे संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी डॉ. अर्चना रणदिवे होत्या. यावेळी डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. अर्चना जयस्वाल, पशुधन विकास अधिकारी भाग्यश्री राठोड, शीला भांडारकर, संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, मुख्याध्यापिका संध्या हेमणे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. यावेळी संध्या हेमणे, नीता कटकवार यांना संस्थाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा आणि कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी डॉ. भाग्यश्री राठोड यांनी महिलांचा दिन फक्त ८ मार्चला साजरा करतो. यापेक्षा रोज साजरा करावा अशी महिलांची कामगिरी आहे असे मत व्यक्त केले. डॉ. निर्मल जयस्वाल यांनी स्त्रियांना कमी लेखू नका, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त प्रभावी असतात, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रीती पाटील, प्रास्ताविक डॉ.सोनाली भांडारकर आणि आभार संध्या हेमणे यांनी मानले.यावेळी विद्यार्थीनिंची लक्षणीय उपस्थिती होती.