शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेला दोन वर्षात बँकेच्या कर्जातून मुक्त करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:45 IST

शिक्षक सहकारी पतसंस्था बँकेच्या कर्जात आहे. येत्या दोन वर्षात पतसंस्थेला बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करू, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंजीव बावनकर : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची आमसभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षक सहकारी पतसंस्था बँकेच्या कर्जात आहे. येत्या दोन वर्षात पतसंस्थेला बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त करू, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी व्यक्त केले.लाखांदूर येथे पतसंस्थेची आमसभा पार पडली यावेळी ते बोलत होते. झालेल्या आमसभेत पतसंस्थेचे संस्थाध्यक्ष संजीव बावनकर यांनी सभासदांसाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. सभासद मृत्यूफंड योजनेत कायमस्वरुपी बदल सुचवून कर्ज मर्यादेच्या प्रमाणात फंड जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.सन २०१६-१७ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बावनकर यांनी ही माहिती देताना, हा फंड १ एप्रिलला कपात करण्यात येणार असल्याचेही सांगितले. तत्पूर्वी दिवंगत सभासद, थोर विभूती, भारतीय शहीद जवान, संस्थेचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष कृपाण गुरूजी यांना श्रद्धांजली अर्पण करून आमसभेला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या व्यवहाराविषयी व कामकाजाविषयी माहिती दिली. या सभेला संस्थेचे उपाध्यक्ष रमेश काटेखाये, शाखाध्यक्ष अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, राकेश चिचामे, राजन सव्वालाखे, विकास गायधने, रमेश सिंगनजुडे, शिलकुमार वैद्य, संचालिका यामिनी गिºहेपुंजे, विजया कोरे, तज्ज्ञ संचालक योगेश कुटे व संस्थेचे सर्व सभासद व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सन २०१६-१७ चे वार्षिक जमाखर्च पत्रक, नफातोटा पत्रक व ताळेबंद पत्रक मंजूर करणे तसेच नफ्याचा विनियोग करणे या विषयावर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थाध्यक्ष बावनकर यांनी सविस्तर उत्तर देऊन सभासदांचे समाधान केले. सभासदांना ७ टक्के लाभांश व ४०० रुपये बैठक भत्ता देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.काही सभासदांनी संस्थेमध्ये झालेली कर्मचारी भरती नियमबाह्य झाली असून ती रद्द करावी अशी मागणी केली. यावर अध्यक्षांनी भरती प्रक्रिया प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे प्रतिपादन यावेळी दिले. तर काही सभासदांनी इमारत दुरुस्ती व फर्निचर खरेदीवर झालेला खर्च हा अंदाजपत्रकापेक्षा जास्त असल्याचा आक्षेप घेतला.यावेळी किरकोळ खर्च, जाहिरात खर्च तसेच ४ लाख २७ हजार २०० रुपये खर्चावर सभासदांनी आक्षेप घेतला. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कर्मचारी सेवानियमाप्रमाणे मंजूरी देण्यात आली असून १ जानेवारी २०१८ पासून ती लागू करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सभेला पतसंस्थेचे सभासद मोठ्य प्रमाणात उपस्थित होते.