शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 18, 2015 00:40 IST

एकेकाळी डीएडला मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागायची. मोठा लग्गा लावावा लागत होता.

भंडारा : एकेकाळी डीएडला मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागायची. मोठा लग्गा लावावा लागत होता. अन् भरमसाट डोनेशन देऊन देखील डीएडला प्रवेश मिळत नव्हता. आता चित्र बदललेले आहे. या क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असल्याने आता संस्थाचालकांना ‘कुणी प्रवेश घेता का प्रवेश’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. डीएडची जिल्ह्याची प्रवेशक्षमता मोठी असली तरी देखील विद्यार्थ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी थाटलेली काही खाजगी महाविद्यालये आज बंद करून, तिथे व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे विदारक चित्र आहे.यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी हजारो अर्ज येत होते. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांचा हा आकडा मोठा होता; परंतु विद्यार्थी मिळत नसल्याने अनेकांनी थाटलेली दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे आजघडीला मोजके महाविद्यालये शिल्लक आहेत. काही संस्थाचालकांनी त्या इमारतीत अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. विद्यार्थी शोधण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सांगून वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. तरीही विद्यार्थी येण्यासाठी तयार नसल्याचे एका शिक्षकाने सांगितले. पूर्वी अन्य अभ्यासक्रमापेक्षा डीएडला मोठी मागणी होती. कमी खर्चात व कमी वयात नोकरी मिळत होती. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात तर बारावी उत्तीर्ण झाले की, प्रत्येक जण डीएडचाच विचार करीत होता. पैसे नसले तर शेती विकूनही प्रवेश घेतला जात होता. सरकारी नोकरी असल्याने, लग्नात हुंडाही मिळत असे. त्यामुळे गेलेला पैसा वसूल होत होता. त्यामुळे सर्वांचाच ओढा याकडे वाढत गेला. विद्यार्थ्यांचा मोठा ओढा व त्यातून भरमसाट शुल्क मिळत असल्याने, संस्थाचालकांनी ठिकठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे दरवर्षी हा अभ्यासक्रम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. भरती नसल्यामुळे मागील पाच ते सहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम केलेले हजारो तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. काही जणांनी संस्थेत पैसे भरले आहेत; परंतु अनुदान नसल्याने पगार मिळत नाही. त्यामुळे आजघडीला पोट भरण्याचाही त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यातील काही जण दिवसा शाळेत नोकरी करून, रात्रीला अन्य ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. काहींचे नोकरी नसल्याने लग्न जुळण्यासाठी अडचणी येत आहेत. या बेरोजगारांनी आपल्या भावना शासनाला वेळोवेळी कळविल्या. मात्र, त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे अनेकांना आपले पदवी शिक्षणही पूर्ण करता आले नाही. पदवी पूर्ण करून तरी अन्य परीक्षा देता येतात. अशा दुहेरी कचाट्यात हे बेरोजगार सापडलेले आहेत. (नगर प्रतिनिधी)पूर्वी अन्य अभ्यासक्रमापेक्षा डीएडला मोठी मागणी होती. डीएड केले की हमखास नोकरीची हमी होती. त्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी पूर्वी मोठी स्पर्धा असायची; परंतु शासनाने अलिकडे ही भरतीच थांबविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. - अभय परिहार, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा.डीएडकडे विद्यार्थी यायला तयार नाहीत. शासनाच्या विविध शाळांत आजही अनेक जागा रिक्त आहेत; परंतु आपल्यावर आर्थिक बोजा येऊ नये. त्याकरिता जागा भरण्यात येत नाही. इंजिनिअरिंगसह अन्य अभ्यासक्रमांना ३५ टक्क्यांवरही प्रवेश दिला जातो. मात्र, डीएडसाठी आजही ५० टक्क्यांची अट आहे. त्यामुळे हेही विद्यार्थी न मिळण्याचे एक कारण आहे. - प्रा नरेश आंबिलकर, भंडारा.