शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गावालगत झुडुपात बिबट्याचा बछड्यांसह ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच गर्दी केली. वनविभाग व पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. बिबट्याच्या भीतीने अनेकांनी घरांच्या छतावरून बिबट व बछड्यांचे दर्शन घेणे सुरू केले. वनविभाग व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शिकारीच्या शोधात जंगलातून भरकटलेल्या एका बिबट्याने दोन बछड्यांसह गावालगतच्या नाल्याच्या झुडुपात माकडाची शिकार करून ठिय्या देण्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. बिबट असल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी एकाच गर्दी केली. या प्रकाराची माहिती वनविभाग व पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून गर्दी हटविली. मात्र या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.   शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच गर्दी केली. वनविभाग व पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. बिबट्याच्या भीतीने अनेकांनी घरांच्या छतावरून बिबट व बछड्यांचे दर्शन घेणे सुरू केले. वनविभाग व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या व बछड्यांच्या सुरक्षिततेसह दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांची तेथून हटविले. वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक जे. के. दिघोरे, आय. जी. निर्वाण, आर. आर. दुनेदार, वनरक्षक बी. एस. पाटील, जी. डी. हत्ते, आर. ए. मेश्राम, केवट, वनमजूर विकास भुते, पांडुरंग दिघोरे, हरिश्चंद्र समरत यांच्यासह पोलीस अंमलदार नीलेश चव्हाण, टेकचंद बुरडे आदी गस्त घालत आहेत. 

बाभळीच्या झाडावरून वनमजुराची गस्त- नाल्यालगतच्या झुडुपात बिबट्यासह दोन बछड्यांनी ठिय्या मांडल्याने दुर्घटना टाळण्यासाठी वन कर्मचारी व पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनमजूर विकास भुते एका बाभळीच्या झाडावर बसून आहे. गावकऱ्यांना या ठिकाणी येण्यास अटकाव केला असला तरी तेथे नागरिकांची गर्दी होत आहे.

दहा दिवसांपूर्वी मारल्या होत्या ३४ कोंबड्या- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याने ९ फेब्रुवारी रोजी खैरीपट येथील शुभम  भागडकर यांच्या गाठ्यात प्रवेश करून ३४ कोंबड्यांसह एका श्वानाची शिकार केली होती. आता १० दिवस लोटत नाही तोच दुसऱ्यांदा बिबट्यासह दोन बछडे गावाजवळील झुडुपात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्या