शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:20 IST

तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण रफादफा करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला असावा.

ठळक मुद्देबाम्पेवाडाची घटना : रफादफा करण्यासाठी मृतदेह फेकला तलावात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचामृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचामृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण रफादफा करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला असावा.साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील खोंड्या तलावात बिबट्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला. ३ ते ४ वर्षाचा बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन केले असता, या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे पुढे आले. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकºयांनी तार कुंपन केले आहे. त्या तार कुंपनात रात्रीच्यावेळी विज प्रवाह सोडला जातो. सदर बिबट शिकारीचा शोधात फिरत असतांना विद्युत भारीत ताराचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला असावा. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संबंधिताने या बिबट्याचा मृतदेह खोंड्या तलावात फेकला असावा असा संशय आहे.शवविच्छेदन पशुवैद्यकिय अधिकारी हेडाऊ यांनी केले. तसेच गडेगाव डेपोत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. एस. तांडेकर, वनक्षेत्रअधिकारी व्ही. जी. कोई, सहायक वनरक्षक चोपकर, बीट रक्षक एम. यु. गिरीपुंजे, आर. बी. पडोळे, एन. एस. निखार, एन एन तपते उपस्थित होते.भंडारा वन विभागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा संचार आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या उपाययोजना अपुºया पडत आहेत. अलिकडे शेतकरी पीक वाचविण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. वन्य प्राणी शेतात शिरू नये म्हणून कुंपणामध्ये विजेचा प्रवाह सोडतात. अशा प्रकारामुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशयखोंड्या तलावात आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू सहा दिवसांपूर्वीच झाला असावा असा संशय आहे. अद्यापपर्यंत शिकारापर्यंत पोहचण्यास वनविभागाला यश आले नाही. बाम्पेवाडा, उमरझरी परिसरात लागूनच न्यू नागझीरा व इतर जंगल आहे. उन्हाळ्यात उमरझरी येथे पाच सहा रानगव्यांचा मृत्यू झाला होता. आलेबेदर येथे एका रानगव्याची शिकार करण्यात आली होती. पंरतु अद्यापही शिकाराचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे या बिबट्याचे शिकारी कधी सापडतील हा प्रश्न आहे. वनविभागाचे फिरते पथक असतांना ही ते खरोखर सक्रिय आहे काय? याची शोध घेण्याची गरज आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू