शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिबट्याचे सितेपारात दर्शन

By admin | Updated: December 26, 2016 00:52 IST

डोंगरला येथे शुक्रवारी दिसलेला बिबटया शनिवारी नवरगाव मार्गे सितेपार येथे गावाशेजारी ग्रामस्थांना दिसला.

बिबटयाला जेरबंद करण्याची मागणी : ग्रामस्थांच्या जीव धोक्यात तुमसर : डोंगरला येथे शुक्रवारी दिसलेला बिबटया शनिवारी नवरगाव मार्गे सितेपार येथे गावाशेजारी ग्रामस्थांना दिसला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर वनपरिक्षेत्राधिकारांनी त्यांच्या पथकासोबत सकाळी ९ च्या सुमारास भेट दिली. बिबटयाने धूमाकूळ घातला नाही त्यामुळे त्याला जेरबंद करण्याकरिता उपाययोजना केली नाही अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. शनिवारी रात्री शिवमंदीर तलावाजवळ काही इसमांना पुन्हा बिबट दिसल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी चार ते पाच वर्षाचा बिबटया डोंगरला स्मशानघाटाजवळ मजूरांना पेरूच्या बगीच्यात दिसला होता. आवाज व कल्लोळामुळे बिबटया तिथून निघून गेला. शनिवारी नवरगाव मार्गे तो सितेपार गाव शिवारात ग्रामस्थांना दिसला. त्यामुळे एकच खळबळ माजली. शेतकरी सध्या शेतशिवारात धानाची मळणी करीत आहेत. सकाळच्या सुमारास बिबटया दिसल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली. ग्रामस्थांनी याची माहिती तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी यांना दिली. जोशी एका पथकासोबत तत्काळ सितेपार येथे दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. तथा रात्री-सायंकाळी शेतशिवारात जाऊ नये अशा सूचना दिल्या. सध्या धान मळणी करण्याचे दिवस सुरु आहेत. सितेपार, नवरगाव, तामसवाडी सह इतर परिसरातील गावातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. बिबटयाने हल्ला केला नाही. धूमाकूळ घातला नाही त्यामुळे त्यास जेरबंद करता येत नाही अशी माहिती लोकमतला दिली. बिबटयाच्या वास्तव्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. येथे बिबटयाला जेरबंद करुन जंगलात सोडण्याची गरज निश्चितच आहे. तशी पावले वनविभागाने उचलण्याची गरज आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे येथे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)