शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सावकाराची शेतकऱ्याला मारहाण

By admin | Updated: March 30, 2015 00:26 IST

सावकाराकडे व्याजासहित रक्कम परत केल्यावरही सावकार व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी कर्जदाराच्या भावाला बेदम मारहाण केली.

तुमसर : सावकाराकडे व्याजासहित रक्कम परत केल्यावरही सावकार व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी कर्जदाराच्या भावाला बेदम मारहाण केली. यात कर्जदाराचा भाऊ गणेश बिसने (२५) रा. गर्रा बघेडा हे गंभीर जखमी झाले. गोबरवाही पोलिसांनी अभयपक्षी (अदखलपात्र) गुन्हा दाखल केला. आदर्श सांसद गाव येथे ही घटना घडली.जखमी गणेश बिसने यांचा मोठाभाऊ निलेशने गावातील अवैध सावकार राजेश ठाकुर याचेकडून एका वर्षापूर्वी ५ टक्के दराने ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. निलेश यानी व्याजासहीत संपूर्ण कर्ज परत केले होते. याचा पुरावा सावकाराकडून मिळालेल्या कागदावर आहे. या कागदावर सरपंच वसंत तरटे यांची स्वाक्षरी शेऱ्यासह आहे. कर्ज व्याजासहित परत केल्यावरही राजेश ठाकुर तथा त्याच्या कुटुंबीयाने कर्ज घेणारे निलेश यांचे लहानभाऊ गणेश यांना नेहमी मानसिक त्रास देत होते. रस्त्यात मार्ग रोखून कर्जाची रक्कम परत करा असी मागणी केली जात होती. गुरुवारी गणेशने याप्रकरणात मागणी करुन मानसिक त्रासाबद्दल विचारणा केली होती. तेव्हा राजेश ठाकुर (३३), राधेश्याम ठाकुर (४०), घनश्याम ठाकुर (३५) यांनी गणेशला बेदम मारहाण केली. यात गणेश गंभीर जखमी झाला. गोबरवाहीचे ठाणेदार अड्याळकर यांनी उभयपक्षी गुन्हा नोंदविल्याचे समजते. यामुळे पोलीस प्रशासनच अवैध सावकारीला येथे प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते. गर्रा बघेडा हे गाव तेव्हा चर्चेत आले जेव्हा खा. नाना पटोले यांनी सांसद दत्तक ग्राम म्हणून गर्रा बघेडा या गावाची निवड केली.गाव आदर्श म्हणून जरी येथे निवड झाली असली तरी त्याची प्रत्यक्ष सुरुवात येथे झाली नाही असे दिसून येते. अवैध सावकारी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलिस प्रशासन येथे अदखल गुन्हा नोंदविते म्हणजेच येथे अवैध सावकारीला निश्चितच पोलिसांचे अभय आहे.खासदार दत्तक गाव म्हणून निवड झाल्यानंतर या गावात अधिकाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधीच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या शासनाला तसा अहवाल आठ ते पंधरा दिवसात पाठविण्यात येत आहे. पालक सचिव म्हणून येथे खंडविकास अधिकाऱ्यांची निवड केली आहे. अवैध सावकारीची माहिती या अधिकाऱ्यांना नसावी काय? हा संसोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)