शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीचा शंखनाद

By admin | Updated: October 21, 2016 00:36 IST

मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे ज्या विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष लागून होते,

भंडारा : मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे ज्या विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष लागून होते, त्या विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारला घोषित झाला. सोमवारला नगर परिषद निवडणुका घोषित झाल्यामुळे विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडणार होत्या, अशा चर्चांना आता विराम मिळाला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होणार असून या निवडणुकीच्या घोषणेमुळे आता संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आमदार राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. ५ डिसेंबर रोजी राज्यातील सहा विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मतदारांची संख्या कमी होती. यावेळी नगरपंचायत सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे ही संख्या वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदारसंघात भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि भंडारा, तुमसर, पवनी, गोंदिया, तिरोडा नगर परिषद सदस्य आणि पंचायत समितींचे सभापती यांचे मतदान होते. त्यामुळे मतदार संख्या ३१९ होती. यावेळी २०१६ मध्ये भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी, लाखांदूर तर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, मोरगावअर्जुनी, सडकअर्जुनी, देवरी नगर पंचायती अस्तित्वाल आले. या १७ सदस्यीय नगर पंचायतीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी मतदार संख्या ३९५ झाली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतील दोन सदस्य अपात्र ठरल्यामुळे मतदार संख्या ३९३ ईतकी राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)