शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पथदिव्यांवर आता एलईडी बल्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:33 IST

शहरात पथदिवे लावताना आता केवळ एलईडी पथदिवेच लावावे असे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देशासन आदेश धडकला : कोणत्याही योजनेतून खर्च करण्यास मनाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : शहरात पथदिवे लावताना आता केवळ एलईडी पथदिवेच लावावे असे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे. ईईएसएलच्या माध्यमातून एस्को तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी करारनामा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैशिष्टपूर्ण योजना किंवा अन्य योजनेतून खर्च करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परिणामी, येथील नगर परिषदेसाठी जिव्हाळ््याची असलेली ही योजना हातून गेली आहे. यावरुन मागील दीड वर्षांपासून ज्या योजनेसाठी नगर परिषदेत वाद सुरू होता तो देखील संपुष्टात आला आहे.शहरातील पथदिवे बदलून तेथे एलईडी पथदिवे लावण्याची योजना सुमारे दीड वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली होती. वैशिष्टपूर्ण, दलितोत्तर व नगरोत्थान अशा तीन योजनांतून सुमारे तीन कोटींची ही योजना शहरात राबविली जाणार होती. यांतर्गत शहरात सुमारे साडेपाच हजार एलईडी पथदिवे लावण्यात येणार होते. यासाठी सन २०१६ मध्ये निविदा काढली जाणार होती. मात्र नगर परिषद पोटनिवडणुकीमुळे त्याला वेळ लागला. त्यानंतर निविदा काढली असता विधान परिषद व नगर परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा खोडा आला. यातून सुटका झाल्यानंतर निविदा काढली असता जीएसटीचा फटका बसला व निविदा रद्द करावी लागल्याची माहिती आहे. परिणामी आता पुन्हा एलईडी पथदिव्यांच्या या योजनेसाठी निविदा काढली जाणार होती. मात्र ऐनवेळी नगर विकास विभागाने आदेश काढल्याने ही योजनाच नगर परिषदेच्या हातून गेली आहे.नगर विकास विभागाचे आदेशउर्जा संवर्धन करण्यासाठी ईईएसएल या केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाशी करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांना पथदिव्यांसाठी एलईडी दिवे बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या नागरी स्वराज्य संस्थांनी या कामासाठी १२ जानेवारी २०१८ पर्यंत कार्यादेश दिले नसतील त्यांना वैशिष्टपूर्ण योजना किंवा अन्य योजनेतून राज्य शासनाने मंजूर केलेला निधी खर्च करता येणार नाही असे आदेशात नमूद आहे. यामुळे आता एलईडी पथदिव्यांसाठी शासनाने नगर परिषदेला मंजूरी दिली असतानाही नगर परिषद कोणत्याच योजनेतून या योजनेसाठी खर्च येणार नाही.आदेशाने अनेकांचा मोहभंगसुमारे तीन कोटींची ही योजना कित्येकांच्या पर्सनल इंटरेस्टची झाली होती. यामुळेच या योजनेसाठी नगर परिषदेत साम, दाम, दंड व भेद या चारही तत्वांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. मागील सुमारे दीड वर्षांपासून या योजनेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू होती.मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे कित्येकांचा मोहभंग झाल्याचे नगर परिषद वर्तुळात बोलले जात आहे.