शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बघेडा जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:44 IST

तुमसर तालुक्यातील बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे बघेडा, पवनारा, मिटेवानी, साखडी, मेहगाव येथील ६०० हेक्टर मधील उन्हाळी धानपीक सिंचनाअभावी धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : धान पीक करपण्याच्या मार्गावर

आॅनलाईन लोकमतपवनारा : तुमसर तालुक्यातील बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे बघेडा, पवनारा, मिटेवानी, साखडी, मेहगाव येथील ६०० हेक्टर मधील उन्हाळी धानपीक सिंचनाअभावी धोक्यात आले आहे. बघेडा जलाशयात बावनथडीचे पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नोव्हेंबर २०१७ ला उन्हाळी धान रोवणीकरीता बघेडा जलाशय भरुन दिला होता. पुन्हा मार्चमध्ये जलाशय भरुन देण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने बघेडा जलाशय अंतर्गत पवनारा, बघेडा, साखडी, मिटेवानी, मेहगाव येथील शेतकऱ्यांनी ६०० हेक्टरमध्ये उन्हाळी धान रोवणी केली. आजपर्यंत सहा ते सात वेळा बघेडा जलाशयाचा पाण्याचा लाभ मिळाला.परंतु सध्यस्थितीत बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे सिंचनाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पिक करपण्याच्या मार्गावर आले आहे. सिंचनाअभावी पिक करपले तर मोठे अनर्थ नाकारता येणार नाही. मागील दोन-तीन वर्षापासून येथील शेतकऱ्याला दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे. कुणाचे पिक सिंचनाअभावी तर कुणाचे पिक किडीमुळे करपल्यामुळे पिकात घट झालेली आहे. स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात कर्ज काढून उन्हाळी धान रोवणी केली व आता बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा पडल्यामुळे सिंचन होणार कसे? या विवंचनेत बघेडा, पवनारा परिसरातील शेतकरी आहेत.