शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन

By admin | Updated: April 6, 2017 00:22 IST

शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आणला गेला. त्यापुढे जाऊन डिजीटल वर्ग, शाळा बनविण्याचा घाट बांधला गेला.

आवश्यक वर्गखोल्या ४० : धोकादायक ५२ वर्गखोल्यामोहाडी : शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आणला गेला. त्यापुढे जाऊन डिजीटल वर्ग, शाळा बनविण्याचा घाट बांधला गेला. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती विद्यार्थ्यांच्या अपघातांची प्रतीक्षा करीत आहे. तथापि जिल्हा परिषदेचे जुन्या इमारतीचे निर्लेखन मंजूरी व इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.विद्यार्थी टिकवून घेण्यासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरतात. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चांगल्या अन् पुरेशा सुविधा उत्प्रेरक ठरतात. तथापि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याच्या नादात पायाभूत सुविधांकडे जिल्हा परिषद कानाडोळा करीत आहे. मोहाडी तालुक्यात तब्बल ५२ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे सादर करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांना ४० वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. तथापि या आधी शाळा निर्लेखन करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषद भंडाराकडे सादर झाले. किमान त्यांना तरी निर्लेखनाची मंजूरी देण्यास अडचण नव्हती. जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ बाब असल्याने धोकादायक इमारती जि.प. च्या परवानगी शिवाय पाडता येत नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच धोकादायक इमारती पाडल्या जाणार का असा सवाल पालक करीत आहेत. कान्हळगाव / सिर. येथील ८० वर्षापूर्वीची शाळेची इमारत धोकादायक आहे. त्यासंबंधी अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचेकडे निवेदन, ठराव सादर करण्यात आले. मात्र कर्णबधीर झालेल्या जिल्हा परिषदेने त्या कागदांकडे बघण्याचे सौजन्य दाखविले नाही. लोकमतने कान्हळगाव / सिर. शाळेची व्यथा मांडली. अन् काय आश्चर्य. गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून ते शिक्षणाधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांनी कान्हळगाव / सिर. या शाळेकडे धाव घेतली. विशेषत्वाने प्राधान्याने लवकरच निर्लेखनाची मंजूरी व नवीन शाळा तसेच दुरुस्ती करावयाच्या वर्गखोल्यांची संख्या ८८ आहे. जिल्हाधिकारी यांच्या निधीतून पटसंख्या व शिक्षक संख्यानुसार ४२० नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. तसेच ३२ वर्गखोल्या निर्लेखीत करायच्या आहेत. पंचायत समितीने २०१५-१६ मध्ये जि.प. प्राथमिक शाळा वरठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातोना, जि.प. प्राथमिक शाळा आंधळगाव, जि.प. प्राथमिक शाळा रोहणा, जि.प. शाळा मोहगाव / करडी, जि.प. प्राथमिक शाळा सिरसोली, जिल्हा परिषद हायस्कुल डोंगरगाव या शाळांनी इमारत निर्लेखन करण्यासाठी पाठविले आहेत. अद्याप जिल्हा परिषदेने इमारत निर्लेखनाची मंजूरी दिली नाही.मोहाडी तालुक्यात ५२ वर्गखोल्या धोकादायक आहेत. याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ पंचायत समितीला सादर करावे. याबाबत मुख्याध्यापकांना पत्र देण्यात आली आहेत. काल पर्यंत केवळ सहा - सात शाळांचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाल्याची माहिती आहे. इमारत दिली जाईल याची शाश्वती दिली याचा अर्थ शाळा व्यवस्थापन समितीने पाठविलेल्या ठरावांना जिल्हा परिषद गंभीरतेने घेत नाही असेच दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा परिषद शाळांकडून आलेले निर्लेखनाचे प्रस्ताव जिल्हा परिषद भंडाराकडे सादर करण्यात आले आहेत. एकही प्रस्ताव प्रलंबित नाहीत.-रमेश गाढवे,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मोहाडी.