शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

स्वसंरक्षणाचे धडे शिकून समाजात परिवर्तन घडवा

By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST

महिलांकडे बघण्याच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यांच्याकडे स्वावलंबी, सक्षम म्हणून बघितल्या जात असले तरी ..

जवाहरनगर येथे महिला मेळावा : मोहबंशी यांचे प्रतिपादनजवाहरनगर : महिलांकडे बघण्याच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यांच्याकडे स्वावलंबी, सक्षम म्हणून बघितल्या जात असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे स्त्री-पुरुष समानतेमधील दरी वाढत आहे. दारुबंदी आणि इतर व्यवसनाधिनतेला आळा घालणे, हुंडाप्रथेचे आव्हान, स्त्री भ्रूणहत्या हे स्त्रीपुढील आव्हान, चित्रपटमध्ये स्त्री देहाचे चित्रीकरण अशा सामाजिक घटनांना महिलांना तोंड द्यावे लागते. अशावेळी महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे शिकून समाजात परिवर्तन घडवून आणावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अजय मोहबंशी यांनी केले. जवाहरनगर येथील कला, वाणिज्य पदवी महाविद्यालयात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.निलीमा इंगोले, डॉ.एम.के. उमाठे, प्रा.डॉ.साधना वाघाडे, प्रा.डॉ.अनिता वंजारी, प्रा.डॉ.सुनीता रविदास, प्रा.डॉ.नलिनी बोरकर उपस्थित होते.यावेळी प्रा.निलीमा इंगोले म्हणाल्या, स्त्री ही कुटुंबाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. पिता हा घराला सुरक्षित करतो. तर माता ही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते. आपल्या मुलांना वेळ प्रसंगानुरुप मित्र मैत्रीणीच्या भूमिकेतून एक आत्मविश्वास देऊन नव नवीन आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य देते. स्त्रीने तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्याचे आव्हान, पूर्ण क्षमतेने स्वीकारावे. आधुनिक महिलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात समर्थपणे पुढे जावे. स्वत:मधील कलागुण व कौशल्यावर आधारित विविध व्यवसाय समर्थपणे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावे. कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत होते. सशक्तीकरणाने, सबलीकरणाने परिवर्तन होते आणि व्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन प्राप्त होते. शिक्षण आणि उच्च शिक्षण आर्थिक आत्मनिर्भर होण्यास मदत होते व महिलांचा सामाजिक स्तर वाढून सबलीकरण होते. प्रा.डॉ.साधना वाघाडे यांनी प्रास्ताविकातून महिला या शक्तीतील ‘मही’ म्हणजे पृथ्वी जो सर्वात प्रबळ व शक्तीशाली आहे. ‘मही’लाच ला जोडल्यास बनणारी महिला ही सामर्थ्यवान, शक्तीशाली आहे. संचालन प्रा.डॉ.सुनिता रविदास तर आभारप्रदर्शन प्रा.अनिता वंजारी यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.पौर्णिमा रहांगडाले, प्रा.डॉ.बोरकर, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (वार्ताहर)