शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार ठरविताना नेत्यांचीच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, उमेदवार ठरविताना नेत्यांचा कस लागत असल्याचे चित्र आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी  घोषित केली नसली तरी संभाव्य उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची, यावर जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व चर्चा करीत आहे; परंतु सध्या सर्वच पक्षांनी चाचपणी करून संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.जिल्ह्यात युती आघाडी होणार नसल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना ५२ उमेदवार शोधणे जिकरीचे काम आहे, तसेच पंचायत समितीसाठी १०४ सक्षम उमेदवार शोधण्याचे दिव्य आहे. त्यातही आरक्षित आणि महिला उमेदवारांचा शोध घेताना पक्ष नेतृत्वाचा कस लागत असल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, तालुकानिहाय बैठकी घेतल्या आहेत. या बैठकीतून उमेदवारांचे मनोगत ऐकून घेतले आहे. राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असून, त्यांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, प्रत्येक मतदार संघात सक्षम उमेदवार देण्यावर त्यांचा भर आहे. शिवसेना या निवडणुकीत ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. तर भाजपने कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्याचा चंग बांधला आहे. अशा स्थितीत सक्षम उमेदवार देताना सर्वच पक्षांचा कस लागत आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस २०, राष्ट्रवादी १५, भाजप १२, शिवसेना १ आणि अपक्ष ४ असे संख्याबळ होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असला तरी निवडणुकीनंतर युती-आघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखायची आहे, तर शिवसेना व भाजप त्याच ताकदीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

गणेशपूरवर बाहेरील उमेदवारांचा डोळा- भंडारा शहरालगतचा गणेशपूर हा मतदारसंघ सर्वसाधारण आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सुशिक्षित मतदारसंघ म्हणून गणेशपूरची ओळख असून, येथे निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. स्थानिक उमेदवारांसोबतच बाहेरील उमेदवारही या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. अनेकांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रंगतदार लढत गणेशपूर जिल्हा परिषद मतदारसंघात होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यासोबतच अनेक अपक्षही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. बाहेरील उमेदवाराला मतदार कितपत स्वीकारतात, हे मात्र काळच ठरवेल.

पहिल्या दिवशी  एकही नामांकन नाही- बुधवार १ डिसेंबरपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या नामांकनाला प्रारंभ झाला. परंतु पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नाही. प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. नामांकन दाखल करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसात गर्दी होण्याची शक्यता आहे. अद्याप उमेदवारही पक्षांनी घोषीत केले नाही. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद