लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/वरठी : सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे कामगार नेते मिलिंद वासनिक यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना कारधा पुलावर घडली. लोखंडी रॉड व धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर भंडारा येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.सध्या सनफ्लॅग कंपनीत कामगार संघटना निवडणूकची धामधूम सुरू आहे. कंपनीतील काम आटोपून संघटनात्मक सभा घेऊन कामगार नेते मिलिंद वासनिक चारचाकी वाहनाने कारधा येथे स्वगृही जात होते. दरम्यान कारधा पुलावर एका चारचाकी वाहनाने धडक दिली. यावरून गाडी चालकाला जाब विचारला त्यांच्यासोबत हुज्जत घातली. धडक करूनही अरेरावी वाहन चालक व त्याच्या सहकार्यांनी मिलिंद वासनिक यांच्यावर लोखंडी रॉड व शस्त्राने हल्ला चढवला. मारहाणीत त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली आहे. हल्लेखोरांनी मिलिंद वासनिक याना नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसल्याने त्यांना मृत समजून ते पसार झाले. तपास सुरू आहे.
कामगार नेत्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:13 IST
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे कामगार नेते मिलिंद वासनिक यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना कारधा पुलावर घडली. लोखंडी रॉड व धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर भंडारा येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
कामगार नेत्यावर प्राणघातक हल्ला
ठळक मुद्देकारधा येथील घटना : खासगी रुग्णालयात उपचार