शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पट्टेदार वाघाचा इसमावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:47 IST

आष्टी - लोभी शिवारातील तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने लोभी येथील शेतकरी चंद्रपाल पुष्पतोडे (४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

ठळक मुद्देआष्टी-लोथी येथील घटना : जखमीला नागपूरला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी - लोभी शिवारातील तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने लोभी येथील शेतकरी चंद्रपाल पुष्पतोडे (४२) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. वनअधिकारी तथा पोलिसांच्या बंदोबस्ताकरिता ताफा असताना त्यांच्या समक्ष वाघाने हल्ला केला, हे विशेष.आष्टी लोभी येथील शिवारातील तलाव परिसरात मंगळवारी गौपाले यांच्या शेतात पट्टेदार वाघ शेतकऱ्यांना दिसला. याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाºयांना देण्यात आली. रेस्क्यू आॅपरेशन त्यानंतर सुरु झाले. दरम्यान तलावपरिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. नागरिकांनी मोठा आवाज करून पट्टेदार वाघाच्या दिशेने दगड भिरकावले. एकच गोंधळ व गोंगाटाने वाघ विचलीत झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वाघाने लोभी येथील चंद्रपाल पुष्पतोडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डावा पाय व मांडीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. वनअधिकारी, कर्मचारी, पोलीस व ग्रामस्थ मदतीला धावल्याने वाघ तिथून पळाला. सुदैवाने चंद्रपाल थोडक्यात बचावला. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर भंडारा व तेथून नागपूर हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.वाघाचे मध्य प्रदेशाकडे पलायनमध्यप्रदेश व महाराष्ट्राची सीमा लागून आहेत. हा परिसर वाघाचा कॉरिडोअर असल्यामुळे या परिसरात वाघाचे वास्तव्य असते, अशी माहिती नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी निलेश धनविजय यांनी दिली. वरिष्ठ अधिकाºयांनी आष्टी लोभी शिवारात पट्टेदार वाघ दिसल्यानंतर खबरदारी व वनकर्मचाºयांना निर्देश देण्याकरिता उपवनसंरक्षक विवेक हौशिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक चोपकर, तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर रेस्क्यू आॅपरेशन पथक व पोलीस कर्मचारी दिवसभर तैनात करण्यात आले होते.तलाव व शेतशिवारात पट्टेदार वाघ दिसल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी वाघाच्या दिशेने दगड भिरकावले. त्यामुळे वाघ अनियंत्रित झाला. वाघाने चंद्रपाल यांच्यावर हल्ला केला. उपस्थितांनी वाघाला हिसकावून लावले.-नितेश धनविजय,वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी.