शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'एलसीबी'ने आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:26 IST

गुन्ह्यांचा शोध लावण्यात कधीकाळी माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने गत अडीच महिन्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा धडका लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी एलसीबीची सुत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तपासाची गती वाढली. चोरी, दारू, जुगार, सट्टापट्टी, कोंबड बाजार, गांजा आदी प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवाणगी केली.

ठळक मुद्देअवघे अडीच महिने : चोरी, सट्टापट्टी, दारू, जुगार आणि गांजा विक्रेत्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गुन्ह्यांचा शोध लावण्यात कधीकाळी माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने गत अडीच महिन्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा धडका लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी एलसीबीची सुत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तपासाची गती वाढली. चोरी, दारू, जुगार, सट्टापट्टी, कोंबड बाजार, गांजा आदी प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवाणगी केली.अडीच महिन्यापुर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे ३ जुलै रोजी एलसीबीचा कारभार येताच सुरूवातीला काही दिवस त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणांचा अभ्यास केला. आता अवघ्या अडीच महिन्यात गुन्हेगारांच्या मसक्या आवळणे सुरू केले आहे. त्यांच्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांच्या अधिनस्त कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले आहेत. त्यांच्या वाढलेल्या कामाचा गतीचे परिणाम अल्पावधीतच दिसू लागले. शहरात आणि जिल्ह्यात घडलेल्या अनेक गुन्ह्यातील पसार आरोपींना जेरबंद करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य मार्गावरून जनावरांची मोठी वाहतूक होते त्याविरूद्ध धाडसत्र राबवून आतापर्यंत २२ लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जुगार, सट्टापट्टी, तासपत्ती जुगार, कोंबड बाजार आदींवर धाडी घालून २५ गुन्ह्यांची नोंद करून ५८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १९ लाख १७ हजार ७३८ रूपये जप्त केले. तसेच दारूबंदी कायद्यांन्वये २६ गुन्ह्यात २८ जणांना अटक केली. भंडारा शहरात २३ आणि २४ आॅगस्ट रोजी दोन इसमांचे मोबाईल हिसकावून घेण्याची घटना घडली होती. याप्रकरणात एलसीबीने दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याजवळून मोबाईल हस्तगत केले तर २७ जुलै रोजी शहरातील रजनीनगरातील एका अपंग व्यक्तीच्या घरातून एटीएमची चोरी झाली होती. चोरट्यांनी या कार्डाच्या मदतीने त्यांच्या खात्यातून २० हजार रूपये काढले होते. याप्रकरणाचा तपास एलसीबीकडे येताच ऋतिक उर्फ व्यंकटेश्वर विश्वचरण पेठकर आणि सुनील वामनराव क्षीरसागर या दोघांना अटक केली. तसेच मोटरसायकल चोरट्यांनाही जेरबंद करण्यात आले. चोरी गेलेल्या पाच मोटरसायकल एलसीबीच्या पथकाने जप्त केल्या. चोरी आणि घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आणून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व इतर साहित्य असा आठ लाख ३३ हजार ९६४ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. गत अडीच महिन्याच्या कालावधीत जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडेकर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे प्रमुख रविंद्र मानकर व त्यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.सराईत चोरटा प्रवीण जेरबंदभंडारा जिल्हा पोलिसांना वॉन्टेड असलेला सराई चोरटा प्रवीण अशोक डेकाटे रा. टिळक वॉर्ड मोहाडी याला एलसीबीच्या पथकाने देव्हाडी येथे २ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याने साकोली तालुक्यातील लवारी, भंडारा तालुक्यातील बेला, नागपूर ग्रामीण हद्दीतील तारसा, अशा पाच घरफोडींची कबूली दिली. त्याच्याजवळून चोरीतील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न आहे. एक तर गुन्हा घडूच नये आणि घडला तर लगेच तो उघडकीस यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.-रवींद्र मानकर, पोलीस निरीक्षक, एलसीबी.