शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथे जनआरोग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:31 IST

केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दाखविण्यात आले. तसेच या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते भगवान धन्वतरी यांच्या प्रतिमेलव माल्यार्पण करुन करण्यात आला.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप : जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार कुटुंबांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दाखविण्यात आले. तसेच या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते भगवान धन्वतरी यांच्या प्रतिमेलव माल्यार्पण करुन करण्यात आला.यावेळी आमदार परिणय फुके, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक माधूरी थोरात, सामाजिक कार्यकर्ते सत्तार खान, मिरा भट आदी उपस्थित होते. आजचा दिवस गोरगरीब जनतेसाठी भाग्याचा दिवस आहे.भारतात तरुणांची लोकसंख्या ३५ ते ४० टक्के आहे म्हणून जगात सर्वात युवा देश म्हणून भारताची गणना आहे. या सर्व व्यक्तींना ५ लाखापर्यंत मदत आरोग्याच्या माध्यमातून होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने जोमाने कार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. देशाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आहे. योजनेची नोंदणी सामान्य रुग्णालयात करावी. रुग्णालयात ई-कार्ड देण्यात येईल, असे ते म्हणाले.प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधूरी थोरात यांनी सांगितले की, केंद्र शासनाने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेस २१ मार्च २०१८ रोजी मान्यता दिली आहे. या योजनेतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटूंबांना प्रती कुटूंब ५ लाख रुपयांपर्यंत देशभरातील मान्यता प्राप्त रुग्णालयामधून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.देशभरातील १०.७४ कोटी, महाराष्ट्र राज्यात ८३ लाख ८३ हजार ६६४ तर भंडारा जिल्हयात १ लाख ३४ हजार ४४८ कुटूंब आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटूंबाला प्रतीवर्षी प्रतीकुटूंब ५ लक्ष रुपयांचे मोफत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. योजनेच्या लाभासाठी कुटूंबातील सदस्य संख्या, वय व लिंग यावर कोणतेही बंधन असणार नाही. देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामधून लाभ घेता येईल. रुग्णालयामध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया असेल. योजनेचा लाभ घेण्याकरीता योजनेचे ई-कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यावेळी सुशिला खंडारे, दिनेश बोरकर, गंगा गिरी, शाहिद अंसारी, ज्ञानेश्वर बोरकर, लिलाधर, गोन्नाडे, चंद्रकांत इडपाते, राम गोटेकर, गजानन गौतम यांना योजनेचे ई-कार्ड प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. संजय गटकुल यांनी मानले. जिल्हयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर व आरोग्य सेवक उपस्थित होते.