शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून खांबतलाव खोलीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:12 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या पुरातन खांब तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आला. नागरिकांनी खांबतलाव खोलीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एका महिन्यात खांब तलावातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे सहकार्य मिळणार : महिनाभरात गाळ काढण्याचा निर्धार, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, तलाव सौंदर्यीकरणाचा आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या मध्यभागी असलेल्या पुरातन खांब तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आला. नागरिकांनी खांबतलाव खोलीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एका महिन्यात खांब तलावातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे.लोकसहभागातून उभी राहिलेली ही चळवळ महिनाभर सुरुच राहणार असून जिल्हा व नगरपालिका प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था व भंडारावासी वेळोवेळी श्रमदान करुन खांब तलावाला पुर्नवैभव प्राप्त करुन देणार आहेत. काळाच्या ओघात लुप्त होत असलेला तलाव पुनर्जिवीत करण्याचा मानस आहे. यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे.१ मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून खांब तलाव खोलीकरणाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, तहसिलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, विजय खंडेरा, संजय एकापूरे, कंत्राटदार मुकेश थोटे, ग्रीनमाईंड संस्था, असर फाऊंडेशन, भंडारा जिल्हा सुधार समिती, श्रीराम सेवा समिती, रोटरी क्लब भंडारा व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.पुरातन खांब तलावातील गाळ काढून तलाव स्वच्छ करा, तसेच तलावाच्या सौंदयीकरणासाठी काठावर वृक्ष लावावे, त्यासाठी एमटीडीसीचे सहकार्य घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नगर पालिकेला दिल्या. एक महिन्यात गाळ काढण्याचे नियोजन करुन तीन महिन्यात तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करा. जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात टाकण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रोत्साहित करावे. या कार्यास लोकसहभाग हा महत्वाचा आहे, तो अधिकाधिक वाढावा,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.तलावाच्या आजूबाजूच्या मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करुन तलावात येणा?्या सांडपाण्याची व्यवस्था इतरत्र करण्याबाबत सांगण्यात यावे. खांब तलावासोबतच शहरातील इतर तालावातीलही गाळ काढून तलावाचे खोलीकरण करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा उपलब्ध होईल. तसेच तलावाच्या जागेत झालेले अतिक्रमण हटविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्याबाबत तहसिलदार यांना त्यांनी सूचनाही केल्या. स्वयंसेवी संस्थानी लोकांचा सहभाग घेवून या कामास लवकरात लवकर कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे व जोमाने काम करावे, असेहीते म्हणाले.मंदिर व तलाव परिसरात येणाºयांनाबसण्याची व विश्रांतीची सोय कशी उपलब्ध करुन देता येईल, याकडे लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भंडारा शहरातील नगर परिषद सदस्य, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी व नागरिक उपस्थित होते. जनसहभागातून वृक्षारोपण व वृक्ष संगोपन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.