शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ऊस गुऱ्हाळाला अखेरची घरघर

By admin | Updated: January 20, 2015 22:32 IST

तुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३० ऊस गुऱ्हाळ ना नफा केवळ तोटा या तत्वावर सध्या सुरू आहेत. खर्च वजा जाता गुऱ्हाळदारांना तोटा सहन करावा लागत असून

मोहन भोयर - तुमसरतुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३० ऊस गुऱ्हाळ ना नफा केवळ तोटा या तत्वावर सध्या सुरू आहेत. खर्च वजा जाता गुऱ्हाळदारांना तोटा सहन करावा लागत असून या गुऱ्हाळांना अखेरची घरघर लागली आहे.सध्या ऊसाचे दर १७०० ते १८०० रूपये आहे. ऊस तोडणी करणे ३०० रूपये खर्च येतो. गुऱ्हाळापर्यंत आणण्याकरिता १५० ते २०० रूपये, गूळ तयार करून बाजारपेठेत नेण्याकरिता १०० रूपये खर्च पकडला तर २२०० ते २३०० रूपये खर्च अपेक्षित आहे. सध्या गूळाला बाजारपेठेत २२०० ते २३०० रूपये खर्च अपेक्षित आहे. सध्या गूळाला बाजारपेठेत २२०० ते २३०० रूपये प्रति क्विंटल भाव आहे. त्यामुळे ना नफा केवळ तोटा या तत्वावर गुऱ्हाळ उद्योग सुरू आहे.एक गुऱ्हाळ तयार करण्याकरिता सुमारे साडेचार लक्ष रूपये खर्च करावे लागतात. मध्यम गुऱ्हाळ केंद्रावर किमान चार ते पाच पुरूष मजूर प्रति पुरूष मजूरी ३५० रूपये तर १० ते १२ महिला मजूर प्रति महिला मजूरी ११० रूपये इतकी आहे. वीज बिल एका महिन्याला ५ ते ६ हजार इतका येतो. एका दिवसात चार ते पाच क्विंटल इतके गूळ तयार करण्यात येते. गुऱ्हाळापर्यंत ऊस तोडणी करून ट्रक्टरने आणणे, ऊस तोडणी असे किचकट कामे आहेत. वीज बिल उद्योगाचे द्यावे लागते. परिश्रम अधिक करावे लागतात. बाजारपेठेत सध्या गुळाचा भाव २२०० ते २३०० रूपये इतके अल्प असल्याने ढोरवाडा येथील गुऱ्हाळ व्यवसायाची गजानन बुधे व बाळु बुद्धे यांनी गुऱ्हाळ उद्योग पुढील महिन्यापासून बंद करणार असल्याचे सांगितले. गूळाची किंमत कमी असल्याने त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना कमी व व्यापाऱ्यांना जास्त आहे. या परिसरात नगदी पीक ऊसाची पेरणी कमी करण्यात आली आहे. ऊसाला सुद्धा भाव नाही, अशी ओरड शेतकऱ्यांची आहे. ऊसाला पाणी भरपूर लागते. अल्प पर्जन्यमान व भारनियमनाचा फटका ऊस पिकाला सुद्धा बसत आहे. ढोरवाडा येथे सहा ऊसाचे गुऱ्हाळ असून तुमसर तालुक्यात सुमारे २५ ते ३० ऊस गुऱ्हाळ आहेत. सर्वांची तक्रारी सारख्या आहेत. गुळाचा गोडवा वाढावा व पारंपारिक गुऱ्हाळ सुरू राहावे, याकरिता राज्य शासनाने दखल घेण्याची मागणी गुऱ्हाळदारांनी केली आहे.