लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तुमसर तालुक्यातील चिखला येथील मॅग्निज माईनमध्ये सकाळी मोठा अपघात झाला. खाणीमध्ये भूस्खलन झाल्याने त्यात एक कामगार दगावला असून पुन्हा काही कामगार दबून असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातील दोन कामगारांना बाहेर काढण्यात आले, एक अद्याप खाणीत ढिगाऱ्याखाली दबलेला असल्याची माहिती येत आहे.
या अपघाताबाबत अद्याप माईन प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. माईन प्रशासन घटना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना आज बुधवारी, 5 मार्चला सकाळी घडली. खाणीच्या प्रवेशद्वारापुढे कामगारांची आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.