शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन दशकांपासून लेंडेझरी तलाव उपेक्षित

By admin | Updated: July 11, 2016 00:25 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.

फटका वनकायद्यातील जाचक अटींचारामचंद्र करमकर आलेसूरभंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.आंतर जिल्हा व महाराष्ट्रातील सेवटच्या टोकावरील ३५ कि़मी. अंतरावरील आदिवासी बहुल गाव लेंडेझरी येथील सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे उपविभागा अंतर्गत लेंडेझरी तलावातील व नहराचे दुरूस्ती करणाचे काम ३३ वर्षापासून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. परिणामी लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षित धोरणाअभावी तलाव भकास व्यवस्थेत पडला आहे. सदर तलावाचे बांधकाम जानेवारी १९७९ ला पुर्णत्वास झाले. परंतु ३३ वर्षाचा कालखंड लोटूनही या तलावाचे उपसाकरण व दुरूस्तीकरण न झाल्यामुळे जलस्त्रोताचा व्याप व प्रचंड पालापाचोळा व गाळ साचलेला आहे. १३ फेब्रुवारी १९८३ मध्ये एकदा या तलावातील खोली करणाचे कामे सुरू करण्यात आले. मात्र तलावातील २.४९ हे.आ. भुभाग आरक्षीत वन कक्षात मोडत असल्यामुळे या दुरूस्तीवर वन विभागाने प्रतिबंध घातला. परिणामी सिमांकित आदिवासी शेतकऱ्याची ९.३० हे.आर. शेतजमीन सिंचना अभावी प्रभावित झाली.कधी काळी पावसाने दडी मारली तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हाच तलाव तारणहार ठरतो. स्थानिक नागरिकांनी ग्रामसभेत या तलावाच्या विकासा संदर्भात वारंवार ठराव पारित केला व संबंधित विभागाला सुद्धा निवेदन, अर्ज सादर केले परंतु यासंबंधी यश आले नाही. या संदर्भात आदिवासी नागरिक म्हणाले की वनकायद्याची बाब केंद्र शासनाशी संलग्नीत असून आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे जवाबी उत्तर अधिकारी वर्गाकडून मिळत आहेत. प्रतिवर्ष पावसाळ्यात या तलावात विविध वनकक्षातून पालापाचोळा, केरकचरा, गाळ येत असल्याने हा तलाव गिळंकृत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी भविष्यात वन्यपशु-पक्षी व गुरांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, याची शक्यता नाकारता येत नाही.