शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड माफियाचा शेतमालकावर हल्ला

By admin | Updated: June 16, 2015 00:37 IST

शेती विक्रीचा मॅग्नम कंपनीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार पैसे दिले नाही.

भोजापूर येथील घटना : गुन्हे दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळभंडारा : शेती विक्रीचा मॅग्नम कंपनीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार पैसे दिले नाही. त्यामुळे नागरिकांना भूखंड न घेण्याचे आवाहन केले असता भूखंडमाफियाने गुंडांना पाठवून हल्ला केला. याची पोलिसात तक्रार नोंदवून पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याचा आरोप प्रविण बांते यांनी पत्रपरिषदेत केला. यावेळी मारहाण झालेले महादेव लोंढूजी बांते, गणपत लोंढूजी बांते, उर्मिला प्रदीप बांते, छाया विजय बांते, वनिता राजाराम बांते उपस्थित होते.कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना प्रविण बांते म्हणाले, आमच्या तीन कुटूंबियांची पाच एकर जमिन मिलिंद घोगरे, रा.नागपूर यांना ५५ लाख रूपये एकराप्रमाणे विकण्याचे तीन करारनामे दि. १२ आॅगस्ट २०१३ रोजी केले. करारनाम्याच्यावेळी २० टक्के रक्कम दिली. डिसेंबर २०१४ मध्ये ३० टक्के रक्क्म घ्यावयाची होती. मिलिंद घोगरे यांनी मॅग्नम कंपनीच्या नावाने बयानपत्राच्या आधारे तिन्ही जमिन एकत्रित करून तहसीलदारांकडून ३० नोव्हेंबर २०१३ रोजी जमीन अकृषक केली. त्यानुसार मिलिंद घोगरे यांना डिसेंबर महिन्यात ३० टक्के रक्क्म देण्याची मागणी केली असता भूखंड विकून पैसे देणार असल्याचे सांगितले. परंतु, तसे करुन दिले नाही. त्यामुळे आम्ही या भूखंडाचा कुणीही सौदा करू नये, यासाठी ले-आउटच्या ठिकाणी फलक लावला. त्यामुळे चिडून जावून मिलिंद घोगरे यांनी गुंडाकरवी आमच्या कुटुंबियावर हल्ला केल्याचा आरोपही बांते कुटुंबियांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)‘त्या’ पोलिसांना निलंबित करा - एकापुरेशेतकऱ्यांना अधिकचे पैसे देण्याचे आमिष देऊन भूखंडासाठी शेती विकत घेणे, त्यानंतर पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणे हा भूखंडमाफियांचा धंदा बनला आहे. बांते कुटूंबियांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल न करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी विहींपचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे यांनी केली.पोलिसांची भूमिका संशयास्पद - श्यामकुंवरपोलिसांनी कारवाईत दिरंगाई केली असून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले नाही. फिर्यादींची एमएलसी केली नाही. याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध श्यामकुंवर यांना दिला आहे.