शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्र गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र ...

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रही बेपत्ता झाली आहेत. याकडे महामंडळाचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरू होणार असून उन्हाचा पारा वाढत जाऊन आगीच्या घटनेत वाढ होते. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये अग्निशमन यंत्रांची सुविधा आहे की नाही, याबाबत बसेसची पाहणी केली असता अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धास्तीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.

आगारात बसस्थानक आओ जाओ घर तुम्हारा

भंडारा येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकात लोकमत प्रतिनिधी गेले असताना कुणी हटकले नाही. येथील बसस्थानकामध्ये आओ जाओ घर तुम्हारा असाच प्रकार सुरू आहे

प्रथमोपचार पेट्या गायब

लालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक, वाहकांवर प्रथम उपचार करण्यासाठी चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून गायब झाल्या आहेत. त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले.

वायफाय सुविधा नावालाच

अँड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मनोरंजन व्हावे, याकरिता प्रत्येक बसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती, याचा कंत्राट एका खासगी कंपनीकडे होता. परंतु वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसमधीलही सुविधा बंद झाली आहे.

कोरोना नियमांची केली जाते काटेकोर अंमलबजावणी

भंडारा बसस्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच तेथील सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावरच तोंडाला मास्क लावा, असे आवाहन करीत आहेत. मास्क न वापरलेल्या प्रवाशांना बसस्थानकामध्ये प्रवेश दिला जात नाही.