शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लीच्या पतसंस्थेत ‘लक्ष्मी’ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 01:33 IST

सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या व्याजाच्या भूलथापा देण्यात आल्या. गावातीलच पतसंस्था असल्याने ग्रामस्थांनी संस्थापक

ग्राहकांची न्यायासाठी धडपड : तारण सोने लांबविले, संस्थापक, व्यवस्थापकांचा मनमानी कारभारभंडारा : सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या व्याजाच्या भूलथापा देण्यात आल्या. गावातीलच पतसंस्था असल्याने ग्रामस्थांनी संस्थापक व व्यवस्थापकांच्या भूलथापांना बळी पडलेल्यांना कोट्यवधींचा चूना लावण्यात आला. तारण म्हणून ठेवलेले सोने असो वा फिक्स ठेवलेली रक्कम यांचा कोट्यवधींचा घोटाळा करून नागरिकांना लुबाळण्यात आले. हा प्रकार घडला सिल्ली येथील लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत.भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील कृष्णकांत देशमुख यांनी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था काही वर्षापूर्वी उघडली. या संस्थेने व्याप वाढविण्यासाठी प्रतिनिधी नेमले. सुरूवातीला या पतसंस्थेने पादरर्शक काम केल्याने ती अल्पावधीतच नागरिकांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था बनली. यामुळे सिल्ली व परिसरातील नागरिकांनी विश्वास ठेवून दैनिक बचत, फिक्स डिपॉझिट, सुवर्णतारण कर्ज यात नागरिकांनी रक्कम व दागिणे गुंतविले. कालावधीनंतर काही नागरिकांनी त्यांनी सुवर्णतारणचे कर्ज फेडून त्यांचे दागिणे परत मागितले. यावेळी पतसंस्थेने त्यांना दागिणे परत करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी मागितला. मात्र सध्या महिन्याभराचा कालावधी लोटला असतानाही ग्राहकांचे दागिणे परत करण्यास उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी संस्थापक देशमुख यांची भेट घेतली. मात्र त्यांनीही हातवर केले. दरम्यान ते मागील महिनाभरापासून पसार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ग्राहकांनी तक्रारीत आरोप केला की, देशमुख यांनी ग्राहकांच्या पैशाची अफरातफर करून स्व:ताच्या नातेवाईकाला लाभ मिळवून दिला आहे. अशा देशमुख यांच्यासह त्यांच्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अफरातफरीचा गुन्हा दाखल करून ग्राहकांच्या घामाचे पैसे परत मिळवून द्यावे, अशा मागणीचे निवेदन सहाय्यक निबंधक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. शिष्टमंडळात ईश्वर माकडे, हरिदास गभणे, खेमचंद कळंबे, दिलीप गभणे, राजेश बागडे, प्रभावती हटवार, प्रभा लांजेवार, आदींसह ग्रामस्थांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)