शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रात तुडतडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:15 IST

तालुक्यातील खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकºयांचे शेवटच्या टप्प्यात धान कापणच्या वेळेस तुडतुडा कीड लागल्याने धानपिक नष्ट होत असल्याने ....

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : पांढºया रंगाच्या तुडतुड्याचा प्रकोप

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकºयांचे शेवटच्या टप्प्यात धान कापणच्या वेळेस तुडतुडा कीड लागल्याने धानपिक नष्ट होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले असून उरल्यासुरल्या आशा अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत.तालुक्यात तुडतुडा लागल्याने धानकापणीच्या वेळेस शेतकºयांना कीडनाशकांची फवारणी करत असल्याने धान शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तालुक्यात १९३९३ हेक्टर पेरणीचे क्षेत्र होते. अपुºया पावसामुळे तालुक्यात ३ हजार हेक्टर जमिनीवर रोवणी करण्यात आली नाही. ज् या शेतकºयांनी थोड्या पावसाच्या आधारे व विंधन विहिरीची मदत घेऊन धान रोवणी केली त्या शेतकºयांचे धानपिक कीड व रोगराईने नष्ट केले आहे.अपुरा पाऊस, बदलते वातावरण, रासायनिक खतांचा वाढता वापर त्यामुळे किडीचे व रोगराईचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १५ दिवसापासून तालुक्यातील प्रत्येक शेतकरी तुडतुड्यांमुळे हवालदिल झाला आहे. तुडतुड्यामुळे ज्या पिकांची शेतकºयांना आशा होती ती सुद्धा निघून गेले आहे. तणसीशिवाय शेतकºयांच्या हातात काहीही राहिले नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील ४९६५ हेक्टर क्षेत्रात तुडतुड्याचा प्रकोप आहे व हे क्षेत्र रोजचे वाढते आहे. खोडकिड्यामुळे १२९० हेक्टर क्षेत्र रोजचे वाढते आहे. खोडकिड्यामुळे १२९५ हेक्टर क्षेत्र, पाने गुंडाळणारी अळी ३०० हेक्टर, करपा १८१३ हेक्टर, गादमाशी १००१ हेक्टर, कडाकरपा ५१० हेक्टर, पर्णकोष करपा ३४५ हेक्टर, माईटस् ३९ हेक्टर, तुरीची लागवड १४११ हेक्टरमध्ये करण्यात आली असून पाने खाणारी व गुंडाळणारी अळीमुळे ४९५ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे.