शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात वादळी पावसासह गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST

यंदाच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सदर क्षेत्रात अर्धे अधिक क्षेत्र ईटियाहोह धरणांतर्गत तर उर्वरित क्षेत्र कृषी वीजपंप सुविधेंतर्गत सिंचित करून धानाची लागवड करण्यात आली आहे.  दरम्यान, सदर लागवडीअंतर्गत धानाचा मोठ्या प्रमाणात निसवा होऊन धानाच्या लोंबी भरण्याच्या मार्गावर असताना, तर काही धानपीक कापणीला आले असताना अचानक झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने उभ्या धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे२०० हेक्टर क्षेत्रातील धानपीक नष्ट : पिंपळगाव को परिसरातील शेतकरी संकटात

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार गत १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक तालुक्यातील काही भागांत झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने २०० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धानपीक नष्ट झाले आहे. सदर नुकसान तालुक्यातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव परिसरात झाल्याची विश्वसनीय माहिती असून उन्हाळी धान उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडल्याची ओरड आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सदर क्षेत्रात अर्धे अधिक क्षेत्र ईटियाहोह धरणांतर्गत तर उर्वरित क्षेत्र कृषी वीजपंप सुविधेंतर्गत सिंचित करून धानाची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान, सदर लागवडीअंतर्गत धानाचा मोठ्या प्रमाणात निसवा होऊन धानाच्या लोंबी भरण्याच्या मार्गावर असताना, तर काही धानपीक कापणीला आले असताना अचानक झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने उभ्या धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. १ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव को परिसरातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव आदी गावांतील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील धानपीक पूर्णत: नष्ट झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतातील धानाच्या लोंबीची धानबियाणे अक्षरश: जमिनीवर गारपिटीने गळून पडल्याने शेतात केवळ धानाची तणस शिल्लक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, खरिपात पूर, अवकाळी पाऊस व किडरोगाने लागवडीखालील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदरची ही  हानी उन्हाळी हंगामात भरून काढण्याच्या उमेदीत शेतकरी असताना १ मे रोजी झालेल्या गारपिटीने हातात आलेले धानपीक नैसर्गिक आपत्तीने हिसकावल्याचे बोलले जात आहे. मदतीची मागणी होत आहे.तालुक्यातील पिंपळगाव को येथे १ मे रोजी वादळी पावसासह गारपीट झाल्याने तालुक्यातील  पिंपळगाव टोली येथील जिवंत तारांसहित विद्युतखांब खाली कोसळले. मात्र, वीजप्रवाह खंडित झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही.

भाजीपाला पिकासह आंब्याचे नुकसान- १ मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पावसासह गारपिटीने तालुक्यातील पिंपळगाव को क्षेत्रात २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान होताना भाजीपाला पिकासह आंबा या फळाचेदेखील नुकसान झाले आहे. ऐन उतरणीला आलेल्या आंब्याच्या फळावर गारपीट व वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात फळे गळून पडली असून शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे.कृषी विभागांतर्गत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण - १ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव को परिसरातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव आदी गावांत वादळी पावसासह गारपीट होऊन  भाजीपाला पिकासह उन्हाळी धानपिकाच्या झालेल्या नुकसानीची तालुका कृषी विभागांतर्गत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाईची मागणी- गारपीट व वादळी पावसामुळे पिंपळगाव को क्षेत्रातील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी- पालांदूर : परिसरात वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी  लावली. मोठ्या थेंबांसह पावसाने २० मिनिटे हजेरी लावली. वीजसुद्धा  खंडित झाली. दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागला. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. आणखी पुढे तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पावसाने आधारभूत केंद्रावरील मोजणी झालेले धान संकटात आहेत, तर कापणी झालेल्या धानाच्या कडपा  भिजल्या आहेत.  उन्हाळी धानाकरिता थोडीफार मदत अवकाळी पावसामुळे शक्य आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस