शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

लाखांदूर तालुक्यात जि.प.च्या आठ शाळा बंदच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:51 IST

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ९० शाळा आहेत. विद्यार्थ्यांची गळती दर वर्षी वाढत असल्याने अनेक शाळा ओस पडु लागल्या आहेत.

व्यथा शिक्षणाची : विद्यार्थ्यांची गळती कारणीभूतप्रमोद प्रधान  लाखांदूरतालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण ९० शाळा आहेत. विद्यार्थ्यांची गळती दर वर्षी वाढत असल्याने अनेक शाळा ओस पडु लागल्या आहेत. प्राप्त माहीतीनुसार तालुक्यातील तब्बल ८ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यापैकी १ शाळा सन २०१५-१६ या सत्रात बद करण्याची पाळी शिक्षण विभागावर आल्याने शिक्षणाचे पवित्र काम करण्यासाठी शिक्षकाना शाळा शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे.लाखांदूर तालुक्यात एकुण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ८५ तर हायस्कुल ५ शाळा आहेत. ३३७ शिक्षक व ६९ शिक्षिका कार्यरत आहेत. मागिल वर्षिच्या तुलनेत २५० विध्याथ्यार्ची गळती चालु वर्षात दिसुन येते. सन २०१४-१५ ला १०,२९० विध्यार्थी तर सन २०१५-१६ या चालु सत्रात केवळ १०,०४४ विध्याथ्यार्नी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला होता. २०१४-१५ ला ४०२ शिक्षक, व ६२ शिक्षिका कार्यरत होत्या. तर सन २०१५-१६ या चालु सत्रात ३३७ शिक्षक व ६९ शिक्षक कार्यरत आहेत. संपुर्ण तालुक्यात केवळ १५ टक्के महिला शिक्षीक असुन तुलनेत शिक्षकांची संख्या जास्त आहे.शासनाच्या शिक्षण विभागाच्या नव्या ध्येय धोरणानुसार तालुक्यातील ज्या शाळेतील पटसंख्या २० पेक्षा कमी आहे अशा शाळांची माहिती मागीतली होती. माहिती संकलन केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. किन्हाळा येथील शाळा चालु सत्रात बंद करण्यात आली. तर अंतरगाव येथील शाळेत एकूण ८ विद्यार्थी, विहीरगाव ९, चिचगाव २०, चिचाळ २०, झरी १७, जिरोबा १७, बोरगाव येथील शाळेत एकूण १७ विध्यार्थ्यांचे प्रवेश आहेत या सातही शाळा आॅक्सिजनवर असून पुढील सत्रात नक्कीच बंद होणार आहेत. लाखांदूर तालुक्यात कानव्हेटची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पालक व विध्यार्थ्यांचा कल कॉन्व्हेटकडे जास्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक १५ ते ३० कि.मी. लांबून ये-जा करीत असल्यामुळे मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला खो मिळत असल्यामुळे शिक्षणाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे शाळा ओस पडत आहेत. शिक्षण विभागाने शाळेतील प्रगतीकडे लक्ष न दिल्यास तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निम्म्या शाळा नक्कीच बंद पडणार यात शंका नाही.